Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : जरांगे, एकनाथ शिंदे यांची बदनामी कोण करतंय? व्हायरल ऑडिओ क्लीपची चौकशी करावी, संजय शिरसाट यांची मागणी

500 Crore Allegation: मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ३२ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्या बदनामीचा कट आहे का, याची तपासणी व्हावी, असे ते म्हणाले.

Jagdish Pansare

Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमधील काही लोक करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात केला होता. या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावर दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. एकनाथ शिंदे यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी आज ३२ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली.

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून भाजपाकडून 500 कोटी रुपये मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी आणले. ते त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांना पोहचवले, अशी कुजबुज भाजपचे लोक करत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता.

ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला 'मनोज जरांगे पाटील को पाच सौ करोड रुपये शिंदे के तरफसे भेजे गये है' असा उल्लेख करत आहे. याशिवाय अनेक गंभीर दावे, खुलासे या क्लिपमध्ये आहेत. या व्हायरल ऑडिओनंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. भाजपाने या ऑडिओ क्लीपची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही या ऑडिओ क्लीपची चौकशी करून दुध का दूध, पाणी का पाणी झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर भाष्य केले.

या क्लिपमध्ये चार जण बोलताना दिसत आहेत, राजकारणात काय केले पाहिजे? याच्यावर ते भाष्य करत आहेत. बांगलादेशच्या तुकड्यापासून ते पालघर येथील घटना, पुतळ्याचे प्रकरण, लोखंडे या दलित मुलाच्या हत्येचा उल्लेख या संभाषणात आहे. यातील आवाज, ही क्लीप तपासली पाहिजे. बोलणारे एकमेकांशी काॅन्फरन्सवर बोलत आहेत. जरांगे पाटील यांनी ही क्लीप दाखवून खूप चागंल केलं. नेमकं षडयंत्र कोण कोणाविरोधात करतयं? जरांगे, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बदनामीचा कट आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचे समर्थन आहे, असे शिरसाट म्हणाले.

२०२४ मधील विधानसभा, लोकसभा निवडणुक काळातील या क्लीपचा वापर आता कोण, कसा करतोय? दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न, राजकारण कोण करतंय? एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोप खोटा, बदनाम करणारा होता, हे क्लीपमधून स्पष्ट होते. ही क्लीप एआय जनरेटेड आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. जरांगे पाटील यांचीही तीच मागणी आहे. बदनामीचे जे प्रकार सुरू आहे यातून दुफळी निर्माण होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.

जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नेमके कोण काम करत आहे?, कोणाकडून कोणाला सुपारी देण्यात आली आहे का?, याचा तपास व्हावा, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली. “समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण होणे परवडणारे नाही. या क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, संबंधित व्यक्ती कोण आहेत आणि हे सर्व घडवून आणणारी शक्ती कोणती आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे,” असे शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT