

Mumbai News: देशभरात सध्या ज्ञानेश कुमार राजीनामा,एसआयआर प्रक्रिया यांवरुन राजकारण तापलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांसह विरोधी पक्षांतीन अनेक नेतेमंडळींनी 'रिजीम चेंज'ची मागणी करतानाच लवकरच देशाच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. याचदरम्यान,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दोन-पाच महिन्यांत काहीतरी गडबड होईल, असं मोठं विधान केलं आहे. याच त्यांच्या विधानावर मंत्री व भाजप नेते परिणय फुके यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना डिवचलं आहे.
भाजप नेते परिणय फुके यांनी राज ठाकरेंच्या 'राजकीय भविष्यवाणी'वर भाष्य केलं आहे.त्यांनी राज ठाकरेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच त्यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना त्यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सुरक्षिततेमुळे ते एवढं बोलत असल्याची टीकाही केली आहे.
परिणय फुके म्हणाले, ज्याप्रकारे राज ठाकरे मोठमोठ्या बाता करताहेत, मला वाटतं की, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संरक्षण दिलं आहे, त्याच्याच आधारे ते आज इतकं बोलताहेत. ज्यादिवशी त्यांची सेक्युरिटी काढण्यात येईल, त्यादिवशी मला नाही वाटत की ते एवढं बोलू शकतील असा खोचक टोलाही मंत्री फुके यांनी लगावला.
तसेच फडणवीसांनी दिलेल्या सेक्युरिटीच्या आधारे इतक्या मोठमोठ्या बाता करणं चुकीचं आहे. ज्यादिवशी त्यांची सुरक्षा काढण्यात येईल, कारण त्यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नाही कधी नव्हतंही. त्यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना त्यांना कशी सेक्युरिटी लागू होते असाही लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह असल्याचं सांगत भाजपच्या परिणय फुकेंनी राज ठाकरेंनी चिमटा काढला आहे.
यावेळी भाजपच्या परिणय फुके यांनी राज ठाकरेंकडे कुठलंही संविधानिक पद नसताना इतकी सुरक्षा त्यांना गरजेचं नाही.मात्र, ज्यादिवशी त्यांची ही सुरक्षायंत्रणा काढण्यात येईल,त्यादिवशी मला वाटत नाही की, राज ठाकरे हे त्यांच्या घराच्याही बाहेर पडू शकतील,अशा शब्दांत मनसे अध्यक्षांवर पलटवार केला आहे.
तर दुसरीकडे भाजप मंत्री परिणय फुके यांच्या टीकेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले,"हिंमत असेल तर राज ठाकरे यांचं पोलीस संरक्षण काढून दाखवा. यावेळी त्यांनी फुकेंच्या कौटुंबिक वादात मनसेनं हस्तक्षेप केला नसल्याचंही आवर्जून सांगितलं आहे.
राज ठाकरेंनी बुधवारी(ता.21)एका पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या 'रिजीम चेंज'च्या मुद्द्यावर थेट भाष्य केलं. ते म्हणाले,"पुढच्या पाच महिन्यांत या देशात काहीतरी मोठी गडबड होईल,एवढं निश्चित" आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा एप्स्टिनसोबतचा फोटो बाहेर आला आता यापुढे खूप गोष्टी बाहेर येणार आहेत, हे आता थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका कर राहणार पण ही गोष्ट आता थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत आख्खा देश रस्त्यावर आला तर मला आश्चर्य वाटणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
तसेच येत्या काळात दुष्काळाची भीषण परिणाम दिसायला लागतील असंही मनसे अध्यक्षांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी अन्न-धान्याची टंचाई निर्माण होईल जे सरकारलाही झेपणारं नसेल. एवढंच होणार नाही पण इतरही अनेक गोष्टी होतील. याच पार्श्वभूमीवर मध्येच एखादी अशी वेळ येईल, जेव्हा या देशाला पंतप्रधानाच नसेल, असं धक्कादायक विधानही राज ठाकरेंनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.