Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या गाडीवर हल्ला, मुलगा थोडक्यात बचावला; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Sanjay Shirsat vehicle attack: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (ता.19) रात्री घडली आहे.

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार थांबला तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना घडल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसै वाटपाचे गंभीर आरोप, पुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, मोहोळमध्ये माजी आमदाराच्या अपहरणाचा प्रयत्न यांसारख्या घटनांनी राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (ता.19) रात्री घडली आहे. या गाडीत शिरसाटांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट हे बसलेले होते. पण त्यांना या हल्ल्यात कोणतीही शारिरीक इजा झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक हा हल्ला करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.एका अज्ञात व्यक्तीने आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला केला आहे.याप्रकरणी पोलिसांकडून हल्लेखोरांचा कसून तपास सुरू आहे.

सिद्धांत शिरसाट हे आपल्या निवासस्थानी निघाले असतानाच हा हल्ला करण्यात आला. गाडीवर मागच्या बाजूने हल्ला करण्यात आल्याचं दिसून येत आहे. आता या हल्ल्यावरुन संजय शिरसाट यांच्यासह त्यांचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिरसाट यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT