Devendra Fadnavis : 'हल्ल्यानंतर देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप; फडणवीसांचा अगदी मोजक्या शब्दांत 'रिप्लाय'; म्हणाले...

Anil Deshmukh Reaction On Anil Deshmukh Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रुग्णालयातून बाहेर पडताच देशमुख यांनी या दगडफेकीमागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला.
Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
Anil Deshmukh Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हल्ला झाल्याने त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती व्यक्त केली जात असतानाच भाजपच्यावतीने देशमुख स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप केला जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोजक्याच शब्दांत रिप्लाय केला आहे.

आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मागून दगड मारला असताना देशमुख्यांच्या डोक्याच्या पुढे कसा लागला असा सवाल उपस्थित केला. त्यांनी कदाचित सलील-जावेद यांची स्क्रिप्ट चोरली असावी असे म्हणून ही संपूर्ण घटनाच बनावट असल्याची शंका व्यक्त केली.

काटोल विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आटोपून परत येत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री दगड भिरकावण्यात आले होते. त्यात ते गंभीर जखमीही झाले होते. एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागता. त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला होता. त्यांना नागपूरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
Vinod Tawde : सीसीटीव्ही तपासा, आयोगाकडून चौकशी होऊ द्या; विनोद तावडेंनी दिले स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रुग्णालयातून बाहेर पडताच देशमुख यांनी या दगडफेकीमागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. दगड मारा, नाहीतर गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, देशमुखांच्या गाडीवर दडफेक मागून करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे. हे खरे असेल तर त्यांच्या डोक्याच्या समोर दगड कसा लागला असा प्रश्न उद्‍भवतो. असा प्रकार रजनीकांत यांच्या सिनेमात बघायला मिळतो. एक भलामोठा दगड त्यांच्या पायाशी पडल्याचे फोटोत दिसते. मागून मारलेला मोठा दगड समोरच्या सिटखाली कसा आला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, देशमुखांच्या गाडीवर दडफेक मागून करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे. हे खरे असेल तर त्यांच्या डोक्याच्या समोर दगड कसा लागला असा प्रश्न उद्‍भवतो. असा प्रकार रजनीकांत यांच्या सिनेमात बघायला मिळतो. एक भलामोठा दगड त्यांच्या पायाशी पडल्याचे फोटोत दिसते. मागून मारलेला मोठा दगड समोरच्या सिटखाली कसा आला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis
Solapur Shiv sena : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; सोलापुरातील दोन नेत्यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी

एक दगड त्यांच्या कारच्या समोरच्या काचेवर लागला आणि त्यात काच तडकल्याचे दिसते. तो दगड सहाजिकच बोनेटवर पडला असेल तर तेथे स्क्रॅचेस पडले असते. मात्र गाडीवर तसे काही पोलिसांना आढळले नाही. मोठ्या गाड्यांच्या काचा मजबूत असतात. एकदोन दगडाने त्या सहजासहजी फुटत नाहीत. प्लास्टिक कोटेड असल्याने दगड किंवा वजनदार वस्तू आदळल्यास काचा तडकतात. आरापार गाडीच्या आत दगड जात नाही या पोलिसांच्या शंकाचा हवाला देऊन फडणवीस यांनी ही संपूर्ण घटना बनावट असल्याचा संशय व्यक्त केला.

सलीम-जावेद यांच्या सिनेमांमध्ये अशा हास्यास्पद घटना नेहमीच बघायला मिळतात. याकडे लक्ष वेधून फडणवीस यांनी कदाचित त्यांची स्क्रिप्ट अनिल देशमुख यांनी उचलली असावी अशी टीकाही केली. मुलगा हरतो आहे हे समोर दिसत असल्याने मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी देशमुखांनी बनावट स्टोरी रचली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com