Sanjay Shirsat Rajendra Janjaal dispute Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat Rajendra Janjaal dispute: शिरसाट-जंजाळ वादावर शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'! मध्यस्थी करत 'असा' काढला तोडगा...

shirsat janjal controversy eknath shinde masterstroke : शिरसाट-जंजाळ वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! मध्यस्थी करत काढलेला तोडगा आणि पडद्यामागील राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याच कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. एवढ्यावरच न थांबता जंजाळ यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढवत दबाव तंत्राचाही वापर केला.

पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी जंजाळ यांचा हा दबाव झुगारून लावत, कुठे जायची तिथे जा, तुम्हाला सगळे पर्याय उपलब्ध आहे, अशी टोकाची भूमिका घेत आपण तूचभरही मागे आटणार नाही, असा सूचक इशारा दिला होता. परंतु आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पाहता पक्षातील बंडाळी परवडणारी नाही हे लक्षात येताच एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष घालून शिरसाट - जंजाळ वादावर तोडगा काढला.

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी संत्रानगरीत दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि युवा सेनेचे ऋषिकेश जयस्वाल यांना समन्वय समितीत स्थान देत जंजाळ यांची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला . आता कुठल्याही प्रकारचा वाद न घालता महानगरपालिकेची तयारी सुरू करा,असे आदेश एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना दिल्याचे समजते.

दरम्यान या बैठकीनंतर राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याशी आपले वैयक्तिक वाद नव्हतेच, माझा आक्षेप हा त्यांच्या कार्यपद्धतीवर, विश्वासात न घेता निर्णय घेण्यावर होता. कुठल्याही पक्ष, संघटनेसाठी ही गोष्ट योग्य नसते आणि म्हणूनच मी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला होता. राज्यात शिवसेना मजबुतीने पुढे जात आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी स्वतःला एक कार्यकर्ता समजतच पक्षाचे काम केले. हेच काम सर्व नेत्यांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता माझ्यात आणि संजय शिरसाठ यांच्यात कुठलाही वाद राहिलेला नाही, आम्ही ताकतीने महानगरपालिकेची तयारी करू आणि भगवा फडकवू,असा विश्वास जंजाळ यांनी व्यक्त केला. जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्याकडून वादावर पडदा पडला असल्याचे सांगण्यात आले असले तरी यावर संजय शिरसाठ यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT