Pune News : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर हे दोन्ही पक्ष पुण्यातही एकमेकांना टाळी देण्याच्या तयारीत असल्याचे बोले जात आहेत. त्यासाठी मनसेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी चहापानासाठी निमंत्रित केले आहे.
गेल्या काही दिवसांन पासून दोन्ही पक्षांच्या युतीच्या बाबतच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेनंतर पुण्यात ही पहिलीच दोन्ही पक्षांची अनौपचारिक बैठक होणार आहे. याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. पक्ष कार्यालयातील या बैठकीत भेटीचा निर्णय झाल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली. बैठकीस अनिल शिदोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष भाजप आणि इतर महायुतीतील पक्षांच्या विरोधात लढणार आहेत. त्यात प्रामुख्याने दोन्ही पक्षांसाठी मुंबईसोबतच पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका आहेत. त्यामुळे तेथे मनसे आणि ठाकरे सेनेच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईत जवळपास हा निर्णय अंतिम झालं असेल तर सांगितलं जात आहे, मात्र पुण्यात आद्यप काहीच हालचाल नव्हती. दोन्ही पक्ष वरिष्ठांच्या सूचनेनुसार आता पुढील निर्णय होतील, असे सांगितले जात होते. आता मनसेकडून थेट ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रिण देण्यात आल्याने दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बुधवारी झालेल्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेतला. यात शहरातील सध्याचे राजकीय वातावरण आणि पक्षाची एकूण ताकद यावर चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) सोबत आघाडी करण्याबाबतही विचारमंथन झाले. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांची संख्या जाणून घेण्यासाठी 12 डिसेंबरपासून अर्ज मागवले जाणार आहेत. प्राप्त अर्जांच्या आधारे पुढील रणनीती ठरवली जाईल.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका निवडणुकीतील पक्षाची सद्यस्थिती, संभाव्य उमेदवारांची संख्या आणि जागावाटपावर प्राथमिक चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) सोबत एकत्र निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, मनसेला आघाडीत सामावून घ्यायचे की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. मुंबईत काँग्रेसने मनसे सोबत येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शिवसेना (ठाकरे गट) मनसेला सोबत घेतल्यास पुण्यातील जागावाटपात गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी राष्ट्रवादी, ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू होत्या, पण मनसे सामील झाल्यास जागावाटपात अधिक गोंधळ निर्माण होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.