Shivsena district chief Rajendra Janjal with Deputy CM Eknath Shinde after securing Deputy Mayor candidature, triggering political tension with Guardian Minister Sanjay Shirsat. Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ठरला पालकमंत्र्यांना भारी; उपमहापौर पदाची उमेदवारी थेट शिंदेंकडूनच आणली!

Rajendra Janjal, Deputy Mayor Nomination : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून थेट उपमहापौर उमेदवारी मिळवत पालकमंत्री संजय शिरसाट यांना राजकीय धक्का दिला.

Jagdish Pansare

Shivsena News : शिवसेनेचे जिल्हाप्रमख राजेंद्र जंजाळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद मिटलेले नाहीत हे शुक्रवारच्या ता.07) घटने घडामोडींवरून दिसून आले. भाजपाने स्वबळावर 57 जागा जिंकत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची संपूर्ण फिल्डिंग लावली होती. पण राज्याच्या सत्तेत युती असल्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिले गेले. त्यानंतर महापौर पदासाठी समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची नावे जाहीर झाली.

विशेष म्हणजे राजेंद्र जंजाळ यांनी आपले नाव थेट शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फायनल करून घेतले. स्थानिक पातळीवर याची पालकमंत्री संजय शिरसाट यांना जराही भनक न लागू देता जंजाळ यांनी आपल्या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले. अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत जंजाळ यांचे नाव जाहीर केले आणि तिकडे संजय शिरसाट यांचा तिळपापड झाला. जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट यांना नडणाऱ्या जंजाळ यांना बाजूला ठेवून आपल्या समर्थकांची वर्णी त्यांना उपमहापौर पदावर लावायची होती.

पण हा डाव राजेंद्र जंजाळ यांनी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या असलेल्या संबंधामुळे हाणून पाडला. शेवटच्या क्षणाला संजय शिरसाट यांनी नंदकुमार घोडेले, मुलगी हर्षदा शिरसाट, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना उमेदवारी अर्ज घ्यायया लावत दबाव तंत्राचा वापर केला. पण शिंदेंनी नाव जाहीर केल्यानंतर शिरसाट यांनी विरोध केल्याचे कळल्यानंतर मुंबईहून तातडीन शिवसेना सचिवांचे पत्र येऊन धडकले. त्यात आदेशाचे पालन करा, असे बजावण्यात आले.

या शिवाय एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांनाही फोन करत गडबड व्हायला नको, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर शिरसाट यांनी बंडाचे निशाण मागे घेतले. गेल्या काही महिन्यांपासून संजय शिरसाट यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याकडून वारंवार आव्हान दिले गेले. महापालिकेसाठी युतीची चर्चा सुरू असताना आपल्याच प्रभाग आणि समर्थकांची तिकीटे कापली जाणार याचा अंदाज आल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेत संजय शिरसाट यांच्याविरोधातच दंड थोपटले होते. अगदी शेकडो समर्थकांना घेऊन ते संजय शिरसाट यांच्या व्हाईट हाऊस या बंगल्यासमोर धडकले होते. त्यामुळे संजय शिरसाट यांना बॅकफूटवर यावे लागले होते.

अगदी भाजपसोबत युती तोडण्याचा निर्णय याच जंजाळ व त्यांच्या समर्थकांच्या प्रभागावरून घ्यावा लागला होता. अर्थात युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेच्या अंगलट आला आणि त्याचे खापरही पालकमंत्र्यांच्या माथीच फोडले गेले. संजय शिरसाट आपला करेक्ट कार्यक्रम करत आहेत, हे लक्षात आल्यानंतर जंजाळ यांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याशीही जुळवून घेतले. महापालिकेच्या उमेदवार देण्यातही या दोघांची भूमिका महत्वाची ठरली होती. एकूणच काय तर राजकीय डावपेचात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हेच पालकमंत्री संजय शिरसाट यांना भारी ठरल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT