Sanjay Shirsat News: 'माझीही वेळ आली होती', पण..मंत्री संजय शिरसाट यांनी सांगीतला अपघाताचा थरार!

Shivsena MLA Sanjay Shirsat Accident Story: अजितदादा एका दुर्दैवी अपघातात गेले, माझीही वेळ आली होती. गाडीचे दोन्ही टायर बस्ट झाले होते. मर्सिडीजच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटल्यावरही मी वाचलो.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. अजित पवारांच्या आठवणीत त्यांचे समर्थक आणि विरोधक आजही हळवे होतात. या घटनेमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दुर्दैवी अपघताने हिरावून नेलेल्या अनेक नेत्यांची चर्चा आणि आठवण या निमित्ताने होत आहे.

अशातच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका सभेत बोलताना 'माझी वेळही आली होती' असा धक्कादायक खुलासा केला. आपण एका मोठ्या अपघातातून बचावल्याचे स्वतः शिरसाट यांनी सांगीतले. शिरसाट सध्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात फिरत आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला एका जाहीर सभेत उत्तर देताना राजकारणात नशीबाची साथ किती महत्वाची असते हे सांगताना त्यांनी आपल्या गाडीला झालेल्या अपघाताबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रात मध्ये सर्वात बजेटवाला मी मंत्री आहे. 22 हजार 500 कोटींचे बजेट आहे. गेली वीस वर्षे मी आमदार आहे. पण, तुम्हाला मी घरातला वाटतो की नाही. मी माझे कुटुंबिय या मंत्रीपदाचा बडेजाव करत नाही. जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर मी आज आहे. अजितदादा एका दुर्दैवी अपघातात गेले, माझीही वेळ आली होती. गाडीचे दोन्ही टायर बस्ट झाले होते. मर्सिडीजच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटल्यावरही मी वाचलो.

Sanjay Shirsat
Sunetra Pawar News: आमदार नसतानाही मंत्री, मुख्यमंत्री कसे होता येते; कायदा काय सांगतो? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा झाल्या..

दुसऱ्या गाडीत बसून घरी आलो, अजून ती गाडी घरी आली नाही. पुण्य जे काही मिळते त्या जोरावर मी जिवंत आहे. आजचा दिवस चांगले काम करा, उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. ही ताकद जेव्हा तयार होते. तेव्हा चिंता करायची गरज उरत नाही, असे म्हणत दोन दिवसांपुर्वी प्रचार सभा आटोपून परतत असताना घडलेल्या प्रसंगाबद्दल संजय शिरसाट यांनी बजाजनगर येथील जाहीर सभेत वाच्यता केली. जिल्हा परिषद प्रचारात पूर्णा येथून परत येत असताना गेवराईजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com