Sanjay Shirsat On Water Issue News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Water Issue : टँकरलॉबी त्यांचीच अन् तोच 'उबाठा'गट स्टंटबाजी करतोय!

BJP leader Sanjay Shirsat criticizes the Uddhav Thackeray-led Shiv Sena's protest over the water crisis, calling it mere theatrics. : 'उबाठा'ने समांतर योजना पूर्ण होऊ दिली नाही. टक्केवारीच्या हव्यासात शहराला वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ते केले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : 'समातंर' योजना कुणामुळे गेली? कुणाचा वाद होता? कोण मातोश्रीवर जावून भेटत होते, कुणी टक्केवारी खाल्ली? हे सर्वश्रुत आहे. हे सर्व त्यांच्याच काळातील पाप आहे. शिवसेना 'उबाठा'गट स्टंटबाजी करून लोकांना मुर्ख बनवत आहे. त्यांचेच टँकर वाहतुकदार त्यांचीच टँकर लॉबी असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. पाणीपुरवठ्यात अडचणी आणून टँकर वाढवून व्यवसाय वाढवण्याचा हा प्रकार असल्याचा घणाघातही शिरसाट यांनी केला.

शिवसेना उबाठा (Shivsena) गटाकडून सुरू असलेल्या 'लबाडांनो पाणी द्या'या आंदोलनावर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेतेच लबाड असल्याचा आरोप करत शिरसाट यांनी त्यांना आंदोलन करण्याचा अधिकारच नसल्याची टीका केली. आजही 140 एमएलडी पाणी येत नाही, केवळ 110 ते 120 एमएलडी पाणी येते. 20 ते 30 टक्क्यापर्यंत गळती अन् अनाधिकृत नळ आहेत.

90 एमएलडी पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करतांना लोकसंख्या लक्षात घेता तुट येते. सिडकोला जिथे पाच एमएलडी पाणी लागत होते. त्या भागात आज लोकसंख्या वाढीमुळे तिथे 26 एमएलडीपेक्षा अधिक पाणी लागते. शहराला 240 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. नव्या योजनेतून 350 एमएलडी पाणी मिळेल. त्याआधारे 24 तास पाण्याची घोषणा नव्या योजनेत केली असल्याचे (Sanjay Shirsat) शिरसाट म्हणाले.

विद्वान अभियंत्यांमुळे शहराला त्रास

पाण्याच्या लाईन वेडीवाकडी नसावी, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे विद्वान अभियंते असताना अशी घोडचूक व्हायला नको होती. सातशे ते पंचवीसशे व्यासाची पाईपलाईन जवळजवळ असताना काळजी घेणे दोघांची संयुक्त जबाबदारी होती. यात महावितरणही सहकार्य करत नसून आडमुठ्या भूमिकेमुळे शहरवासियांना त्रासाला सामोरे जावे लागले. शंभर फुटावर तीन ठिकाणी पाण्याची लाइन एल आकारात वळवण्यात आली. त्यामुळे वारंवार तिथेच पाईपलाईन फुटत होती.

ती लाइन सरळ करून स्वतंत्र लाइन टाकण्‍याचा निर्णय घेतला. त्याला तीन चार दिवसांचा वेळ लागला. ते काम पूर्ण झाल्याने पाणी पुरवठा आता सुरळीत झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाच्या अभियंत्यांनी हे काम वेळीच योग्य पद्धतीने केले असते तर शहरातील नागरीकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावी लागला नसता. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आपण मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार करणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.

'उबाठा'ने समांतर योजना पूर्ण होऊ दिली नाही. टक्केवारीच्या हव्यासात शहराला वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ते केले. आताचे काम पूर्ण करू देण्यासाठी त्या कंपनीला 110 कोटी द्यावे लागले, हे चटके कुणामुळे बसले? हे सर्व टक्केवारीवरून घडले. महापालिकेत ते सत्ताधारी होते. त्यांनी टक्केवारी घेतली त्यामुळे ही योजना गुंडाळली गेली, असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला.

नव्या पाईपलाईनमधून पाणी मिळण्याची आता नवीन डेडलाईन नाही. या योजनेवर लक्ष ठेवून असलेले उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मनपा आयुक्त आणि पालकमंत्र्यांना नव्या पाणी पुरवठा योजनेत रोज काय काम झाले याचा दररोजचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. कंत्राटदाराची मुदत संपली आहे. त्याला अडीचशे ते तीनशे कोटींची वाढही दिली. त्यामुळे त्याने काम जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या असून रात्र दिवस काम सुरू, असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT