Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा तब्बल 14 महिन्यानंतर तुरंगाबाहेर येणार आहे. यासाठी कोर्टाने त्याला विशेष परवानगी देखील दिली आहे. जयराम चाटे याचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे दोन मार्चला निधन झाले होते. त्याच्या बाराव्याच्या दिवशी धार्मिक विधीसाठी आपल्या उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी म्हणून जयराम चाटे याने वकीलांच्या मार्फत कोर्टात अर्ज केला होता.
या अर्जावर शुक्रवारी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या अर्जाला सरकारी वकीलांनी विरोध दर्शवला होता. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकत पोलिस बंदोबस्तात सकाळी ९ ते ४ या वेळेत धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी जयराम चाटे याला दिली आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्ताचा खर्च जयराम चाटे यालाच करावा लागणार आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी चाटे याने न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले होते की, हे प्रकरण अतिशय संवेदनशिल आहे. संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष याकडे लागले आहे. यातील आरोपीला बाहेर सोडल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उज्वल निकम यांनी सांगितले होते. हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने सव्वावर्षापूर्वीच पाहिले होते. आता जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणतील मुख्य आरोपी आणि सुत्रधार हा वाल्मिक कराड आहे. तसेच या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे ,जयराम चाटे,महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले हे आरोपी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.