Kolhapur Politics : ZP-महापालिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी: मुश्रीफांचा भाजपवर निशाणा; गोकुळवर भाष्य अन् सतेज पाटलांचे नाव घेत सूचक वक्तव्य

Hasan Mushrif Satej Patil Gokul Politics: कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’चे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या आधीच महायुतीत खदखद समोर येताना दिसत आहे.
Hasan Mushrif, Satej Patil
Hasan Mushrif, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोल्हापूर महापालिकेतील परिवहन सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले असतानाही भाजपने युतीधर्म पाळला नाही, अशी नाराजी हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

  2. ‘गोकुळ हा पक्ष नसून संस्था आहे’, त्यामुळे तेथे पक्षीय नव्हे तर संस्था पातळीवरील राजकारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  3. सतेज पाटील सोबत येणार का या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सध्या काही सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य केले.

kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण गोकुळच्या भोवतीने फिरताना दिसत असून पुन्हा एकदा सतेज पाटील- हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना दिसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण कोल्हापूर महापालिकेतील परिवहन सभापतीपद आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत जनसुराज्यने घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली आहे. यामुळे दोन कारणांमुळे महायुतीत खदखद बाहेर येताना दिसत आहे. तर यावरूनच द्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर नाराजी व्यक्त कर आपली खदखदही व्यक्त केलीय. तसेच यावेळी त्यांनी गोकुळबाबत बोलताना जे सोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल, जे विरोधात असतील त्यांना विरोध केला जाईल, असे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याबाबतही संकेत दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर ‘महापालिकेत परिवहन सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते, पण तिथे भाजपने युतीधर्म पाळला नाही. हे बरे नव्हे,’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महायुतीतील मित्रपक्षावर नाराजी व्यक्त केली. अनौपचारीक बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील बैठकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, हे ‘जनसुराज्य’ कसे सांगत आहे, असा सवाल करत आपली खदखदही त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका, जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळ आदी निवडणुकासंदर्भात आज पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी अनौपचारीक चर्चा केली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘महायुती म्हणून आम्ही महापालिका निवडणूक लढलो आहे. यानंतर कोणकोणती पदे कोणाला किती कालावधीसाठी द्यायचे हे ठरले आहे. त्यामुळे पहिले परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे होते. भाजपकडून याची स्पष्टोक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचा उमेदवार देऊन पहिले परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेकडे दिले आहे. भाजपने युतीधर्म पाळला नाही. हे बरं नव्हे.’

Hasan Mushrif, Satej Patil
gokul politics : गोकुळमधील 'मनपा' आघाडी तुटली, आता नव्या सहकाऱ्यांना घेऊन महाडिक भिडणार

ते पुढे म्हणाले, ‘जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे अध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका कायम आहे. मुंबईतील बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित होते.

त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला द्यावे, असे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सांगण्यात आले. आमच्या पक्षाच्या विजयी उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अध्यक्षपद आम्हालाच पाहिजे, ही आमची भूमिका रास्त आहे. तीच मी त्या बैठकीत मांडली आहे. आता लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे नेते ही सर्व माहिती देणार आहोत.’

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीचा दरारा कमी झाल्यामुळे डावलले जात आहे, असा संदेश जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ‘अजित दादा’ हे दादाच होते. त्यांच्या नसण्याने पक्षाची पर्यायाने महाराष्ट्राची हानी झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण जनतेसमोर आलेच पाहिजे, हीच आमचीही भूमिका आहे. आमदार रोहित पवार यांचीही भूमिका योग्य आहे.’

‘गोकुळ’चे राजकारण संस्था पातळीवरील

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये पक्षनिहाय जागा वाटप करावे, भाजपने नेतृत्व करावे, असे कोणी म्हणत असेल, तर ‘गोकुळ’ हा ‘पक्ष’ नव्हे तर ‘संस्था’ आहे हे समजून घ्यावे लागेल. गोकुळमध्ये जे सोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल, जे विरोधात असतील त्यांना विरोध केला जाईल. हे पक्षीय नव्हे, तर संस्था पातळीवरील राजकारण आहे. येथे सत्ता महायुतीचीच येईल.’ दरम्यान, आमदार सतेज पाटील सोबत असणार काय? या प्रश्‍नावर ‘ते आताच कसे सांगता येईल’, असेही मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif, Satej Patil
Gokul politics : 'गोकुळ' च्या कारभाऱ्यांचे वारसदार जिल्हा परिषदेच्या रिंगणात; वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे खांद्यावर घेत संघातील निष्ठा टांगली खुंटीला

FAQs :

1. हसन मुश्रीफ यांनी भाजपवर नाराजी का व्यक्त केली?
कोल्हापूर महापालिकेतील परिवहन सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले असतानाही भाजपने युतीधर्म पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला.

2. ही प्रतिक्रिया त्यांनी कुठे दिली?
पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

3. ‘गोकुळ’ संदर्भात मुश्रीफ यांनी काय म्हटले?
‘गोकुळ हा पक्ष नसून संस्था आहे, त्यामुळे येथे पक्षीय नव्हे तर संस्था पातळीवरील राजकारण असते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

4. सतेज पाटील यांच्या भूमिकेबाबत मुश्रीफ यांनी काय सांगितले?
सतेज पाटील सोबत येतील का याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.

5. कोल्हापूरच्या राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो?
या वक्तव्यामुळे महायुतीतील मतभेद आणि कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com