Santosh Deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh : अंगावर 56 जखमा, नाकातून रक्त येईपर्यंत मारलं; पोस्टमॉर्टमचा सविस्तर रिपोर्ट वाचून अंग शहारलं!

Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्जशीटच्या माध्यमातून रोज नवी माहिती समोर येत आहे.

Hrishikesh Nalagune

Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल 1400 पानांच्या चार्जशीटच्या माध्यमातून रोज नवी माहिती समोर येत आहे. याच चार्जशीटमधून आता देशमुख यांचा सविस्तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधील एक एक शब्द अंगावर शहारे आणणारा आहे.

काय आहे देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये?

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, देशमुख यांच्या सर्वांगावर मारहाण झाली आहे. त्यांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्ही गालांवर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना तोंडावर मारले होते. बुटाने छातीवर लाथा मारल्याने त्यांच्या बरगड्यांनाही गंभीर इजा झाली होती. त्यांच्या पोटावर बेदम मारहाण झाली होती. त्यामुळे आतड्यांना गंभीर इजा झाली होती.

याशिवाय संतोष देशमुख (Santosh Deshmukh) डाव्या खांद्यावर, दंड, कोपर, मनगट, हाताच्या मुठींवर गंभीर जखमा आढळून आल्या. सततच्या मारहाणीमुळे या जखमा काळ्या निळ्या झाल्या होत्या. त्यांच्या पूर्ण पाठीवर लोखंडी रॉड वळ आढळून आले. सर्वाधिक मुका मार पाठीवर झाल्याने संपूर्ण पाठ काळीनिळी झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मांडी, गुडघा, नडगीवरही गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे जखमा झाल्या होत्या.

यापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार, देशमुख यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आढळून आल्या होत्या. तसेच त्यांच्या शरीरात दोन ते अडीच लिटर रक्त गोठले होते. त्यावरून त्यांना किमान अडीच ते तीन तास मारहाण सुरूच होती, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीही याबाबत सभागृहात माहिती सांगितली होती. त्यानंतर आता सविस्तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधील सगळी माहिती अंगावर शहारे आणणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT