Women's Day : महिला आमदारांनाच 'महिला' प्रश्नांचे वावडे; विधिमंडळातील 'वुमेन्स डे स्पेशल' चर्चा रद्द

Women's Day : महाराष्ट्र विधिमंडळात शनिवारी (8 मार्च) रोजी होणारी एकदिवयी 'महिला दिन विशेष चर्चा' रद्द करण्यात आली आहे.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात शनिवारी (8 मार्च) रोजी होणारी एकदिवयी 'महिला दिन विशेष चर्चा' रद्द करण्यात आली आहे. महिला आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिवेशनादरम्यान, शनिवार आणि रविवारी विधिमंडळाचे कामकाज बंद असते. पण, यावेळी 8 मार्च रोजी महिला दिनी कामकाज घ्यावे असे अधिवेशनापूर्वीच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. या दिवशी फक्त महिलांच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा व्हावी आणि त्यावर ठोस निर्णय व्हावेत अशी संकल्पना होती.

Vidhan Bhavan
Ladki Bahin Yojana: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट!

मात्र, महिला आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील महिला दिनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची होती. त्यामुळे ही एकदिवसीय चर्चा रद्द करावी आणि पुन्हा कधी तरी ठेवावी अशी विनंती या महिला आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली.

Vidhan Bhavan
IPS Success Story: ...थेट मुख्यमंत्र्यांनाच दिलं लग्नाचं निमंत्रण! 'या' महिला आयपीएस अधिकाऱ्याचा भन्नाट किस्सा

त्यानुसार आता 8 मार्चला विधिमंडळ कामकाज होणार नाही. यामुळे अधिवेशन कामकाजाचा आणखी एक दिवस कमी झालाच आहे. पण या निमित्ताने महिलांच्या प्रश्नांवर पूर्ण दिवसभर चर्चा होण्याची संधीही महिला आमदारांनी गमावली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.