Bajrang sonawane, santosh deshmukh  Sarakrnama
मराठवाडा

Santosh Deshmukh murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवी अपडेट; तपासात आणखी एका यंत्रणेची एन्ट्री होणार, बजरंग सोनवणेंनी दिले संकेत

Bajrang Sonawane statement : आता येत्या काळात या प्रकरणाच्या तपासासाठी आणखी एक यंत्रणेचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी व विशेष पोलीस पथकाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणात आठ जणांना मोक्का लावण्यात आला आहे तर एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यातच आता येत्या काळात या प्रकरणाच्या तपासासाठी आणखी एक यंत्रणेचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत आष्टी येथील उपसा सिंचन योजनेसह विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बजरंग सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत मोठे संकेत दिले.

येत्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात ईडीचा देखील समावेश आगामी काळात होईल, असे स्पष्ट बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी सांगितले. यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत मी शेवटपर्यंत समाधानी राहणार नाही. कारण मारेकऱ्यांना फाशी झालेली नाही. या प्रकरणात कट कारस्थान ज्यांनी रचलेलं आहे, त्यांना सुद्धा आरोपी म्हणून अटक केली पाहिजे. हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

आरोपींना पळवण्यासाठी ज्यांनी मदत केली, कुणी ब्लँकेट पुरवले, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले, कुणी मोबाईल दिले, कुणी संरक्षण दिलं, अशा सर्व लोकांना या प्रकरणात आरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्व आरोपींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी समाधानी राहणार नाही. तोपर्यंत मी काम करत राहणार असल्याचे, बजरंग सोनवणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT