Shivsena UBT : शिवसैनिकांना संधी मिळावी यासाठी 'स्थानिक'च्या निवडणुका स्वबळावरच..., ठाकरेंच्या शिलेदाराने स्पष्टच सांगितलं

Local Body Elections : ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे.
Anil Desai
Anil DesaiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 05 Feb : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सुरू असलेल्या चर्चांनुसार काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची माहिती आहे.

मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावरच लढवणार असल्याचा रेटा रेटत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याची चर्चा होत असताना कोल्हापुरात (Kolhapur) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी स्थानिकच्या निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा केली.

Anil Desai
Latur Crime : न्यायालयाचा शिंदेंच्या मराठवाड्यातील शिवसेना नेत्याला मोठा झटका; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी 10 वर्षांचा कारावास

कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे आल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे निष्ठावान शिवसैनिकांना संधी मिळू शकते. अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.

लोकसभेला महाविकास आघाडी एकदिलाने लढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे शिवसेनेला फारसे यश मिळू शकले नाही. यावेळी त्या-त्या मतदारसंघांतील स्थानिक शिवसैनिकाला संधी मिळू शकली नसल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देसाई (Anil Desai) यांनी स्पष्ट केले.

Anil Desai
Shiv Sena: थांबा! साहेब येताहेत, कुठेही जाऊ नका ; नाराजांना रोखण्यासाठी ठाकरे सेनेची धडपड

पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आणि तो मजबूत करण्याच्या दृष्टीने सामान्य शिवसैनिकाला संधी मिळावी. अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर कळवली होती. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपामुळे निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. अशी खंत सामान्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होती.

त्यानंतर स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळण्यासाठी ही निवडणूक बळावरच लढवावी लागेल, असं यापूर्वीच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले होते. दरम्यान शिवसैनिकांना या निवडणुकीच्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा निर्णय योग्यच असल्याचंही अनिल देसाई म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com