Krishna Andhale Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात वावरतोय? 'त्या' फोनमुळे चर्चांना उधाण

Krishna Andhale Absconding : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला (Krishna Andhale) पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

Jagdish Patil

Beed News, 18 Mar : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला (Krishna Andhale) पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

फरार आंधळेला अटक न केल्यामुळे विरोधकांसह देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये (Nashik) असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मात्र, तपासानंतर ती अफवा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे आणि तो जिवंत तरी आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी सोमवारी (ता. 17) मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात असल्याचा गंभीर दावा केला आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, "मध्यंतरी मला एक फोन आला होता. त्या व्यक्तीने मला सांगितलं की, "संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तृतीय पंथीयांच्या वेशात असू शकतो.

शिवाय बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांशी आंधळेचे चांगले संबंध होते. त्यामुळे तो त्यांचा वेशात एखाद्या वस्तीमध्ये असू शकतो. याबाबत आपण पोलिसांना सांगावं, असा फोनवरील व्यक्ती बोलल्याचं देसाई यांनी सांगितलं.

मात्र, त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे की नाही याबाबतची माहिती नसल्यामुळे मी तातडीने त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तृप्ती देसाई यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खरंच आंधळे सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तृतीय पंथीयांच्या वेशात आहे का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT