BJP MP Controversial Statement : सोलापूरकर, कोरटकरनंतर 'या' भाजप खासदाराचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींचा उल्लेख करत म्हणाले...

Pradeep Purohit Controversial Statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच आता भाजप खासदाराने केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Pradeep Purohit controversial statement
Pradeep Purohit controversial statementSarkarnama
Published on
Updated on

Pradeep Purohit Controversial Statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच आता ओडिशातील बारगडचे भाजप खासदार प्रदीप पुरोहित (Pradeep Purohit) यांनी बजेट सत्रा दरम्यान बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय भाजपकडून जाणूनबुजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

Pradeep Purohit controversial statement
Nagpur Violence: नागपूर का पेटलं? स्थानिक भाजप आमदाराचा मोठा दावा; प्रत्यक्षदर्शींनी काय अनुभवलं

खासदार पुरोहित नेमकं काय म्हणाले?

संसदेत बोलताना भाजप (BJP) खासदार प्रदीप पुरोहित म्हणाले, "गिरजा बाबा म्हणून एक संत आहेत. त्यांच्याशी मी संवाद साधत असताना त्यांनी मला सांगितलं की, सध्या जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि ते दुसऱ्या जन्मात नरेंद्र मोदी आहेत." असा अजब दावा भाजप खासदाराने केला आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी संताप व्यक्त केला आहे. गायकवाड यांनी एक्सवर लिहिलं की, "अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.

Pradeep Purohit controversial statement
Nagpur violence : 'त्या' मंत्र्याच्या वक्तव्यामुळे नागपुरात दंगल उसळली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका. शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.", अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com