MCOCA court rejects bail plea of accused Vishnu Chate in Santosh Deshmukh murder case. Sarkaranama
मराठवाडा

Sarpanch Santosh Deshmukh Case : तुरुंगातून कायमच बाहेर येण्यासाठी वाल्मीक कराड, विष्णू चाटेची धडपड : उच्च न्यायालयात धाव

Sarpanch Santosh Deshmukh case latest update : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांनी दोषारोप रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रकरणातील ताज्या कायदेशीर आणि राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Jagdish Pansare

Sarpanch murder case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घृण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मीक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण कोर्टाने त्याला जामीन नाकारला. बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असले तरी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, या मागणीसाठी कराड, चाटे या दोन्ही आरोपींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या दोघांनी बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात काय सुनावणी होते? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे.

या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांकडून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण, पुरावा म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची 'क्लोन कॉपी' देण्याची मागणीही याचा समावेश होता. सरकारी पक्ष केवळ त्यांना फायद्याचा असेल तेवढाच डेटा दाखवत असल्याचा आरोप त्यांच्या वकीलांनी केला होता.

न्यायालयाने स्वत: लॅपटॉप कोर्टात ओपन करून संपूर्ण डेटा तपासावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. तर आरोपी जयराम चाटे याने बीड न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून, प्रतीक घुले याने जेलमधूनच आपला अर्ज सादर केला आहे. तर विष्णू चाटे याने जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पुढील सुनावणी 21 मे रोजी

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात पोलीसांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना अटक केली, तर कृष्णा आंधळे हा आरोप अजूनही फरार आहे.

12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT