Rahul Patil News : आमदार राहुल पाटलांचा विरोधकांना आक्रमक इशारा! म्हणाले,'असे किती आले अन्...'

MLA Rahul Patil political warning : आमदार राहुल पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आक्रमक इशारा दिला. ‘असे किती आले अन् किती गेले’ असे म्हणत त्यांनी राजकीय वातावरण तापवले.
Rahul Patil News : आमदार राहुल पाटलांचा विरोधकांना आक्रमक इशारा! म्हणाले,'असे किती आले अन्...'
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कार्यकर्ता निर्माण करणारा कारखाना आहे. आमच्या पक्षात किती आले आणि किती गेले, पक्षाला काही फरक पडत नाही. जितके गेले त्यापेक्षा कितीतरी नवीन कार्यकर्ते पक्षात तयार होत असतात, अशा शब्दात परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राजीनामा देणाऱ्या व उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

गेल्या काही महिन्यापासून परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांचे समर्थक जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची पदावरून उचलबांगडी केली. विष्णू मुरकुटे यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली. या कारवाईच्या दणक्याने खासदार संजय जाधव समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती.

Rahul Patil News : आमदार राहुल पाटलांचा विरोधकांना आक्रमक इशारा! म्हणाले,'असे किती आले अन्...'
Thalapathy vijay : थलपती विजयाच्या आनंदावर विरजण : चित्रपटसृष्टीतील जवळच्या व्यक्तीचे निधन; साश्रूनयनांनी दिला निरोप

जाधव यांच्याही जिव्हारी ही कारवाई लागली आणि यातून 82 हून अधिक समर्थक पदाधिकाऱ्यांना आपापल्या पदांचे राजीनामे द्यायला लावून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जाधव यांच्या या दबाव तंत्राला भीक न घालता पक्ष नेतृत्वाने आक्रमक भूमिका घेतली आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यावर आता नव्याने संघटनात्मक बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे.

आमची शिवसेना ही कार्यकर्ता घडवणाऱ्यांची फॅक्टरी आहे, असे कितीही आले आणि गेले तरी पक्षाला काही फरक पडत नाही. जितक्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते गेले, त्यापेक्षा अधिक पटीने नवीन कार्यकर्ते पक्षात तयार होत असतात. पक्षातील नाराजी ही चार भिंतीच्या आड व्यक्त केली गेली पाहिजे. उघडपणे नाराजी प्रकट करणे हे पक्ष शिस्तीत बसत नाही, त्यामुळे ही शिस्त मोडणाऱ्यांवर भविष्यातही कारवाई केली जाईल, असा इशारा राहुल पाटील यांनी दिला.

Rahul Patil News : आमदार राहुल पाटलांचा विरोधकांना आक्रमक इशारा! म्हणाले,'असे किती आले अन्...'
Tamil Nadu politics : तामिळनाडूत 'रिसॉर्ट पॉलिटिक्स', फोडाफोडीच्या धास्तीने आमदारांना राज्याबाहेर नेलं; सत्तासंघर्ष टोकाला! नेमकं काय घडलं?

खासदार संजय जाधव हे पक्ष सोडून जाणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. सध्या ते आमच्यासोबतच आहेत, भाजप आणखी किती लोकांना पक्षात घेणार कोणास ठाऊक? आता त्यांची गाडी फुल्ल झाली आहे. एखाद्या पक्षात एवढी गर्दी झाली तर ते चांगले नसते, असा टोलाही राहुल पाटील यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com