Santosh Deshmukh Murder Case Witness Dada Khindkar News Sarkarnama
मराठवाडा

Santosh Dehsmukh Case: 'धनंजय देशमुखांसोबत राहू नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको; दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी!

Santosh Deshmukh Murder Case Witness Dada Khindkar News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. साक्षीदार दादा खिंडकर यांना समाधान खिंडकर यांच्याकडून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Beed Politics News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या दादा खिंडकर यांना त्यांच्याच सख्या भावाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नको, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको, प्रकरण मिटवून घे, नाहीतर.. अशा शब्दात धमकावले आहे.

या प्रकरणाता दादा खिंडकर यांनी आपला भाऊ समाधान खिंडकर याच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर आणि समाधान या भावांमध्येच आता टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे.

या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना संतोष देशमुख खून प्रकरणात साक्ष न देता हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी समाधान खिंडकर याने फोन केला. दादा खिंडकर आपल्या घरी असताना, त्याचा लहान भाऊ समाधान खिंडकर याने जुना वाद उकरून काढत वाद घातला. 'तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण मिटवून घ्यायला सांग, अशी धमकीच त्याने दिली.

यावर दादा खिंडकरने यांनी 'तुला याच्याशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर', म्हणत फटकारले. यातून दोन भावात वाद झाला आणि समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ केली. या प्रकारानंतर दादा खिंडकरने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने दखल घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मात्र, थेट हत्या प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी सख्या भावानेच धमकी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT