Toxic Liquor Tragedy in Pune: मध्यरात्री एका झटक्यात तब्बल 21 अधिकारी निलंबित; CM फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई

21 Officials Suspended Pune Poisonous Liquor 13 Deaths: पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Devendra Fadnavis big update on toxic liquor tragedy
Devendra Fadnavis big update on toxic liquor tragedySarkarnama
Published on
Updated on

Pune Hooch Tragedy News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस दल तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे दोन्ही विभागांत मोठी खळबळ उडाली आहे.

मागील दोन दिवसांत हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली. प्राथमिक चौकशीत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे तसेच परिसरातील अवैध दारू व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Devendra Fadnavis big update on toxic liquor tragedy
Madhya Pradesh News: भाजप भाकरी फिरवणार! 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू, मोहन यादव मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री?

या कारवाईत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये काही महत्त्वाच्या विभागांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. पुणे परिसरातील अनेक संशयित ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मिथेनॉल मिश्रित सुमारे 600 लिटर दारू बाजारात पोहोचण्यापूर्वीच जप्त करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis big update on toxic liquor tragedy
Jalgaon MLC Election: जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला? गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनंतर प्रशासनाने घेतलेल्या या कठोर कारवाईमुळे राज्यभरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांची जबाबदारी अधिक काटेकोरपणे निश्चित केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com