Jalgaon Police Transfers: पोलिस दलात मोठी उलथापालथ! जळगावमध्ये एकाच आदेशात 399 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Jalgaon Police Reshuffle 399 Officers Transferred: जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 399 अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 43 PSI यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Jalgaon Police Reshuffle 399 Officers Transferred
Jalgaon Police Reshuffle 399 Officers TransferredSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Police News: जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. एकाच आदेशात तब्बल 399 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही सर्वात मोठी बदली प्रक्रिया मानली जात आहे. या निर्णयामुळे पोलिस विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये 43 पोलिस उपनिरीक्षकांचा (PSI) समावेश आहे. याशिवाय शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, महिला कर्मचारी आणि चालक कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे आणि शाखांमध्ये नव्याने मनुष्यबळाचे पुनर्वाटप करण्यात आले आहे.

Jalgaon Police Reshuffle 399 Officers Transferred
Toxic Liquor Tragedy in Pune: मध्यरात्री एका झटक्यात तब्बल 21 अधिकारी निलंबित; CM फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई

पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार, 342 कर्मचाऱ्यांच्या बदल्या या पूर्णपणे प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे, मनुष्यबळाचे संतुलित नियोजन करणे आणि कामकाजात कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jalgaon Police Reshuffle 399 Officers Transferred
Madhya Pradesh News: भाजप भाकरी फिरवणार! 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू, मोहन यादव मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री?

40 कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक विनंतीचा विचार करून त्यांना इच्छित ठिकाणी बदली देण्यात आली आहे. याशिवाय 17 चालक कर्मचाऱ्यांचाही बदली आदेशात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलातील अनेक कर्मचारी आणि अधिकारी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत होते.

सरकारच्या विद्यमान धोरणानुसार अशा कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली करणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर 27 मे रोजी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत आलेले प्रस्ताव, रिक्त पदांची स्थिती आणि विभागीय गरजांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम यादीला मंजुरी देण्यात आली.

Jalgaon Police Reshuffle 399 Officers Transferred
Jalgaon MLC Election: जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला? गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

या व्यापक बदल्यांमुळे जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये नवीन अधिकारी आणि कर्मचारी रुजू होणार आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हे नियंत्रण, तपास प्रक्रिया आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात अधिक परिणामकारकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बदली आदेश प्राप्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने नवीन नियुक्तीस्थळी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवणे आणि प्रशासन अधिक सक्षम बनवणे, हा या मोठ्या फेरबदलामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बदली झालेल्या PSIची नावे

  1. शरद पुरुषोत्तम जडे

  2. कन्हेंया त्रिनाथ पाटील

  3. राजेंद्र चिंधा चव्हाण

  4. अनिल विश्वनाथ भांडे

  5. रवींद्र बिश्वास सूर्यवंशी

  6. राजेश पंढरीनाथ चौधरी

  7. सुनील पंढरीनाथ पाटील

  8. दिपक लक्ष्मण वाघ

  9. रहमतअली रहेमान सैय्यद

  10. शंकर पुंडलिक पाटील

  11. सुनील तोताराम आंधळे

  12. मधुकर पुंडलिक पालोलेवाल

  13. बाळकृष्ण श्रावण पाटील

  14. राजू देवीदास अडकमोल

  15. हेमंत संतोष देवरे

  16. बापू जगन्नाथ वराडे

  17. पंडीत नामदेव वानखेडे

  18. युवराज बंडू नाईक

  19. सुनील ताराचंद पाटील

  20. शामकांत तुकाराम लाड

  21. अब्दुल रशिद नासिर खान

  22. किशोर गिरधर चौधरी

  23. प्रकाश कडू महाजन

  24. राजेंद्र भास्कर पाटील

  25. संजय गबडू पाटील

  26. चंद्रकांत खेमचंद खाचणे

  27. सुनील रामचंद्र फेगडे

  28. रवि पंढरीनाथ नरवाडे

  29. वाहीद महमूद तडवी

  30. शेख इस्माईल शेख इब्राहिम

  31. जमशेर गफुर तडवी

  32. दिलीप नवल थोरात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com