Beed News, 04 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करतानाचे भयानक आणि काळीज पिळवटून टाकणारे फोट समोर आले आहेत. हे फोटो व्हायरल होताच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे फोटो व्हायरल होताच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असेलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
त्यानंतर अखेर मंगळवारी (ता.04) रोजी धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) आपला राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंडे राजीनामा देणार हे समजताच विरोधकांनी त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होती, अशी टीका करायला सुरूवात केली आहे.
मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर या सर्व प्रकरणावर बीडचे खासदार आणि संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण सुरूवातीपासून लावून धरणारे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का झाला? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, हत्येचे फोटो संपूर्ण राज्याला पिळवटून टाकणारे आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी एवढा उशीर का झाला? आमच्या तोंडातून शब्द निघत नाहीत असं वाईट कृत्य फोटोंमधून समोर आलंय. हे सर्व असतानाही हा विषय इतका का लांबला? या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे.
लढा देण्यासाठी सत्ताधारी आमदार, लोकप्रतिनिधी, विरोधकांसह सर्व जनता लढली तेव्हा कुठे राजीनामा झाला. मात्र या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
दरम्यान, हे फोटो पाहिल्यानंतर माणुसकीला काळिमा फासणारी एवढी भीषण घटना बीडमध्ये घडली आहे. ते फोटो पाहून तोंडातून शब्दसुद्धा आम्हाला उच्चारता येत नाहीत तर मग त्या कुटुंबाचं काय होत असेल? त्या मुलीने, त्या भावाने, त्या आईने काय करावं? एवढी घटना घडूनही जर त्यांच्याकडे नितिमत्ता नाहीच पण संवेदनशीलताही नसेल तर या राजकारण्यांना काय करायचं? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुंडेंसह सरकारवर हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.