satish Bhosle Sarkarnama
मराठवाडा

Satish Bhosale house demolition : सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’च्या घरावर वन विभागाने फिरवला बुलडोझर!

bulldozer action on Khokya house : वन विभागाने कारवाई करण्याअगोदर खोक्या भोसलेच्या घराजवळ मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता.

Mayur Ratnaparkhe

forest department action against Khokya : सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ हा मागील काही दिवसांमध्ये त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता अखेर पोलिसांना सापडला असून त्याला प्रयागराज येथून मुंबईत आणलं जात आहे. तर दुसरीकडे गुरुवारी या खोक्याच्या अनधिकृत घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे. शिवाय, मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मूदत दिली गेली आहे.

वनविभागाच्या जमिनीवर खोक्याने हे अनधिकृत घर बांधलं होतं. त्यामुळे वनविभागाने अखेर आता ही मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून या खोक्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत.

वन विभागाने कारवाई करण्याअगोदर सतीश भोसलेच्या(Satish Bhosale) घराजवळ मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. वनविभागाच्याच जमिनीवर खोक्याचा बंगला होता आणि कार्यालय देखील होता. यावर आता वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे.

या आधी खोक्याच्या घरातून मांस, कोयते, शिकारीचे जाळे आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ज्या घरावर वनविभागाने कारवाई केली आहे, त्या ठिकाणी एक स्वतंत्र हॉल देखील होता, जिथे तो बैठका घ्यायचा आणि अनेक प्राण्यांची कत्तल करून मेजवाणी देखील करायचा, असं सांगितलं जात आहे. ग्लास भवन अशी त्याच्या इमारतीची परिसरात ओळख होती, कारण ती पूर्णपणे काचेची होती.

खोक्याला आता शुक्रवारी सकाळी बीडमध्ये आणलं जाईल. शिरुर परिसरात त्याची मोठी दहशत होती. त्यानुसार त्या परिसरात जे त्यांनी कारनामे केले आहेत, त्याबाबत त्याचा जबाब घेतला जाणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT