Beed Political News : सतीश भोसले उर्फ खोक्या याला उत्तर प्रदेश पोलीसांनी प्रयागराज येथून आज अटक केली. बीड पोलीस त्याला घेऊन रवाना झाले आहेत. यावर भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. खोक्या हा धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या सगळ्या कारनाम्यांना त्यांचाच आशीर्वाद आणि तेच त्याचे आका असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जाऊ लागले आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी सतीश भोसलेच्या अटकेनंतर 'खोक्या सापडला आता, बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे'अशी प्रतिक्रिया 'एक्स'वर व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बावी गावात एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आले.
त्यानंतर या खोक्याचे अनेक थक्क करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शिरूर तालुक्यातील सतीश भोसले हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. (Suresh Dhas) अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांपासून दूर पळणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून अटक केली आहे.
दरम्यान ज्या भाजपा आमदार सुरेश धस यांच्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी काल बीडमध्ये पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. सुरेश धस हे धुतल्या तांदळाचे नसून सतीश भोसले उर्फ खोक्या याचे 'आका' तेच आहेत. खोक्याच्या घरी शिकारी साठीची हत्यारे व अनेक गंभीर स्वरूपाची शस्त्र सापडली आहेत.
स्वत: सुरेश धस यांनी तो माझा कार्यकर्ता आहे असे कबूल केले आहे. त्यामुळे 'खोक्या सापडला, आता बोक्यालाही बिन भाड्याच्या खोलीत पाठवले पाहिजे' असा टोला धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी लगावला आहे. कालच अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबावर केलेले आरोप फेटाळून लावले होते.
सतीश भोसले प्रकरणात सुरेश धस यांना सह आरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर आज विधीमंडळ परिसरात धस यांनी अजय मुंडे हा अजून लहान आहे, त्याला काही माहित नाही, त्यामुळे त्याच्या आरोपांना उत्तर देणार नाही, असे म्हटले होते. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाल्यानंतर संधी साधत अजय मुंडे यांनी आता धस यांना डिवचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.