Satish Bhosale Sarkarnama
मराठवाडा

Satish Bhosale News : सतीश भोसले उर्फ खोक्या जेलमधून सुटताच म्हणाला, 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही'!

crime case verdict News : बॅटने मारहाण प्रकरणानंतर खोक्याची अनेक प्रकरण बाहेर आली, नोटांची उधळण करणारा, महागड्या गाड्या उडवणारा आणि भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा खंदा समर्थक म्हणून खोक्याची राज्यभरात चर्चा झाली.

Jagdish Pansare

Beed News : वर्षभरापुर्वी एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि सतीश भोसले उर्फ खोक्याची महाराष्ट्राला ओळख झाली. अमानूषपणे मारहाण प्रकरणी खोक्याला तब्बल वर्षभर जेलची हवा खावी लागली. बॅटने मारहाण प्रकरणानंतर खोक्याची अनेक प्रकरण बाहेर आली, नोटांची उधळण करणारा, महागड्या गाड्या उडवणारा आणि भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा खंदा समर्थक म्हणून खोक्याची राज्यभरात चर्चा झाली.

बीडच्या शिरूर कासारमधील बॅटने मारहाण प्रकरण व ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याची कोर्टाने काल निर्दोष सुटका केली आहे. जेलमध्ये असलेल्या खोक्याला अखेर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तुरुगांतून बाहेर आल्यानंतर शिरूर या त्याच्या राहत्या गावात समर्थकांनी त्याचे जंगी स्वागत केले. आज सत्याचा विजय झाला, सत्य परेशन हो सकता हे पराजित नही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. राजकीय लोकांनी षडयंत्र करून मला फसवण्याचा प्रयत्न केला, पण न्यायदेवताने न्याय दिला, याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले.

एक वर्ष मी जेलमध्ये होते, राजकीय लोकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवतेने मला न्याय दिला, सत्याचा विजय झाला. हेलिकाॅप्टर रीलमधून चर्चेत आलेल्या सतीश भोसले याने आपण वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकाॅप्टरमध्ये त्यांना घेऊन बसलो होतो, असे सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये पटक्यामध्ये बसलेले माझे वडील कोणालाच दिसले नाहीत, मी तेवढा दिसलो. वडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही तो मुलगा काय कामचा? असेही खोक्याने माध्यमाशी बोलताना सांगितले.

सुरेश धस यांनी आधार दिला..

भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्या आधार दिला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी आपले म्हणून आपुलकीने वागणूक दिली, माणुसकीच्या नात्याने शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या विरोधकांनी अण्णाला टार्गेट केले. माझ्या घरी जे मांस सापडले, ते माझे नव्हते, तुम्ही मला एक सांगा जर एखाद्या माणसाने गुन्हा केला तर त्याचा पुरावा तो घरात ठेवेल का? माझ्या घरात ते मांस कोणीतरी आणून टाकले होते, असा दावाही भोसले याने केला.

या घटनेनंतर माझ्या कुटुंबावर अन्याय झाला, त्यांना घरातून बाहेर काढले, मारहाणा झाली, माझं कुटुंबच उघड्यावर पडले. माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई यात गेली. माझ्या कुटुंबाने काय भोगले असेल, माझी मुलं या परिस्थितीत कशी जगली असतील? याचा विचार करून मन सुन्न होते. यापुढे आपण सामाजिक कार्य नव्याने सुरू ठेवणार, असल्याचे भोसले त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT