Sharad Pawar-Raosaheb Danve
Sharad Pawar-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

शरद पवार आणि भाजप नेत्याचा एकाच गाडीतून प्रवास; चर्चेला उधाण!

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एकाच गाडीतून औरंगाबाद ते बीड असा प्रवास केला. एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटातील वादामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Sharad Pawar and Raosaheb Danve traveled in the same motar)

गेवराईचे पंडीत कुटुंबीय पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा वाढदिवसानिमित्त पवार आणि दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पंडीत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी पवार आणि दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास करणे पसंत केले. शरद पवार औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेसुध्दा त्याच हॉटेलमध्ये होते. बीडला जाण्यासाठी दोघांनी एकाच गाडीचा वापर केला. ते दोघेही औरंगाबादहून गेवराईकडे रवाना झाले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच, एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत, त्यातच पवार आणि दानवे यांनी एकाच गाडीतून एकत्रित प्रवास करणे, चर्चेचे ठरले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT