धनुष्य बाण गोठववून `त्यांनी` शिवसैनिकांचे रक्त तापवले!

निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिवसेना कार्यकर्ते संतापले.
Jayant Dinde
Jayant DindeSarkarnama

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission of India) काल शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह (Symbol) व पक्षाचे नाव तप्तुरते गोठवले. (Freeze) या निर्णयाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. या निर्णयाची एव्हढी घाई होती का? रात्रीच्या अंधारात निर्णय जाहीर केला. आयोगाने चिन्ह गोठवले पण शिवसैनिकांचे रक्त तापवलेय. हे तापलेले रक्त नक्कीच बंडखोरांना उत्तर देईल, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयंत दिंडे (Jayant Dinde) यांनी `सरकारनामा`ला सांगितले. (Shivsena leaders angree on ECI decision of freeze symbol)

Jayant Dinde
आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बोलवली बैठक...

श्री. दिंडे म्हणाले, निवडणूक आयोगाने शिवसेनेला एक दिवसाची नोटीस देऊन माहिती मागीतली, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. एका दिवसात सर्व प्रक्रीया कशी होऊ शकते?. आयोगाने किमान शिवसेनेने दाखल केलेली कागदपत्र, प्रतिज्ञापत्र यांची तरी स्क्रुटीनी करायला हवी होती. त्यासाठी काही वेळ घेतला असता, तर ठिक होते. मात्र तसे काहीही न होता त्याच दिवशी कार्यालयीन कामकाज संपल्यावर निर्णय जाहीर होतो. यातून आमच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होते.

Jayant Dinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

ते पुढे म्हणाले, राज्यात लवकरच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणूक शिंदे गटाचा उमेदवारच नाही. त्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. अशा स्थितीत घाईने निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, असे आम्हाला वाटते.

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने काहीही फरक पडणार नाही. शिवसेनेविषयी जनतेत काय संदेश जायचा तो गेला आहे. आता कोणतीही व कितीही महाशक्ती आल्या तरी आम्ही त्यांना तोंड देण्यास सज्ज आहोत. या निर्णयाने जनतेला संदेश गेलेला आहे. त्यांनी आमचे चिन्ह गोठवले आहे. मात्र आमच्या शिवसैनिकांचे रक्त तापवलेय, त्याचे काय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसैनिकांना घडवले आहे, त्यांचे रक्त उसळी मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या संतापापुढे आता त्या बंडखोर आमदारांचे काय होईल, हे त्यांना भविष्यात दिसेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com