Uddhav Thackeray-Sanjay Shirsat-Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

MLA Sanjay Shirsat News : शरद पवारांकडून ठाकरे गट संपवण्याचे प्लानिंग

Sharad Pawar is planning to end the Thackeray group, MLA Sanjay Shirsat alleges : अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा आदित्य ठाकरे यांनी केलेला दौरा हा स्टंट असून ज्यांना शेतात कोणते पीक आहे याची माहिती नाही, असे लोक आज बांधावर जात आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

Jagdish Pansare

Shivsena Political News : छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असे विधान करणे म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवार यांची प्लॅनिंग असून शरद पवार या खेळात तरबेज आहेत असे, सांगत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे.

अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा आदित्य ठाकरे यांनी केलेला दौरा हा स्टंट असून ज्यांना शेतात कोणते पीक आहे याची माहिती नाही, असे लोक आज बांधावर जात आहेत, अशी टीका संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली. मागच्या आठ दिवसापासून मराठवाड्यात प्रचंड पाऊस आहे, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. या सगळ्या स्थितीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी योग्य त्या कार्यवाहीचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

पण याच्यातही राजकारण करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. दोन-तीन शेतात जाणे, शेतकऱ्यांशी हात मिळवणे एवढ्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. त्यांचा हा दौरा निव्वळ स्टंट होता. ठाकरे यांच्या वाहनात सरडा शिरल्याच्या घटनेवर टोला लगावताना एक सरडा बाजूला आहे, त्याला आधी काढा, असा टोला शिरसाट यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

महंत रामगिरी महाराज, आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाईसाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला काल पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला, याकडे संजय शिरसाट यांचे लक्ष पत्रकारांनी वेधले. (Shivsena) यावर रामगिरी महाराज, नितेश राणे यांच्यावर त्यांनी केलेल्या विधानावरून गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त हिंदूच नाही तर सर्वधर्मीयांच्या धर्मगुरु, संताची काळजी घेतली जाईल, असे म्हटले होते, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने इतर निधी वळवल्याचा आरोप केला जातोय. संजय शिरसाट यांनी हा आरोप फेटाळला, लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे इतर विभागाचा निधी वळवला किंवा त्यात कपात केली, या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT