Eknath Shinde: ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्या, 7 जुलै रोजी आपल्या मतदारसंघात भव्य शेतकरी संवाद दौरा आयोजित केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे या दौऱ्यासाठी परभणीमध्ये येणार होते. या माध्यमातून हजारो जाधव समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार होते. शक्ती प्रदर्शनाची मोठी तयारी झालेली असताना आता एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा स्थगित करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे हे आजारी असून त्यांच्यावर ठाण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळं पुढील काही दिवसांचे त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर 28 जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी परभणीचा दौरा केला होता. या दौऱ्यात खासदार संजय जाधव यांच्यावर ठाकरे, राऊत यांची चांगलेच तोंडसुख घेतले होते.
ठाकरेंच्या पक्षाकडून झालेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या शेतकरी संवाद दौऱ्यातून प्रत्यूत्तर दिले जाणार होते. शिवाय संजय जाधव यांना देखील मतदारसंघातील आपले राजकीय वजन, ताकद दाखवण्याची संधी यामुळे मिळणार होती. परंतू या सगळ्यावर आता पाणी फिरले आहे. एकनाथ शिंदे आजारी असल्याने परभणीचा त्यांचा नियोजित दौरा आता स्थगित करण्यात आला आहे. आता पुढील तारीख निश्चित झाल्यानंतर हा दौरा होईल.
खासदार संजय जाधव यांनी या सदंर्भात माहिती दिली असून एकनाथराव शिंदे साहेब हे मागील दोन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने दिनांक 7 जुलै रोजी परभणी येथे आयोजित शेतकरी संवाद मेळावा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे कळवले आहे.
शिंदे साहेब लवकरात लवकर पूर्णपणे निरोगी व्हावेत, ही सदिच्छा. आषाढी वारीनंतर हा मेळावा आयोजित करण्याचे नियोजन असून कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण संवाद, अशी बॅनरबाजी संपूर्ण परभणीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.