Beed Loksabha News : बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असताना भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांची शिवसंग्राम आपल्यासोबत असल्याचं दावा केला आहे. त्यामुळे याबाबत मेटेंच्या शिवसंग्राम सेनेची नेमकी भूमिका काय राहणार याची उत्सुकता आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्या शुक्रवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह जिल्ह्यात आल्यानंतर समर्थकांनी त्यांचे धामणगाव (ता. आष्टी) येथे जल्लोषात स्वागत केले. मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, भिमराव धोंडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, आर. टी. देशमुख, केशव आंधळे, शिवसेनेचे कुंडलिक खांडे, विजय गोल्हार, वाल्मिक निकाळजे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारण करताना मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही की कधी जातीभेद केला नाही. मी मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी पंकजा, तुला परळी विधानसभा लढायची आहे, असं सांगितल्याने त्यांची आज्ञा कधीच खाली पडून दिली नाही. त्यांच्या अकाली निधनानंतर मी राज्यात नसते तर खूप गडबड झाली असती, म्हणूनच मी राज्यात थांबले आणि प्रितम मुंडेंना केंद्रात पाठवलं. मी पराक्रमी आहे, प्रीतम परिक्रमा करणारी आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
2019 मध्ये पराभवानंतर पडल्यावर काही जण पंकजा मुंडे संपली असं म्हणत होते. पण मी संपणार नाही. माझ्या सभेने अनेक जण खासदार होतात. मी कधीच जातीपातीचा विचार करत नाही. मी सगळ्या जाती धर्माची माऊली आहे, कुठल्या नेत्याची सावली नाही. मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका योग्यच आहे, पण कदाचित माझ्या माध्यमातून हा विषय पूर्ण होणार असेल, मराठा आरक्षणाचा आक्रोश योग्यच आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी कधीच जातीपातीच्या मंचावर गेले नाही. या सगळ्यांची एकत्र मोट बांधण्याची गरज आहे, ती बीडमधून बांधायची आहे. सगळ्या रंगांना एक करायचं आहे. पोटातून काम करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या. कोणाला तरी या समाजात सौख्य राहून द्यायचं नाही. पण त्यांचा डाव आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मी सन्मान करते’, असंही त्यांनी सांगितलं. ‘विनायक मेटेंची शिव संग्राम आजही आमच्यासोबत आहे, मला लोकसभेची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील अनेक नेते बीड जिल्ह्यात राजकारण करतात, पण जनता तसं करू देणार नाही.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.