Lok Sabha Election 2024 : पक्षाने जबाबदारी दिली तर बंधू जानकरांची समजूत काढणार; पंकजा मुंडे सरसावल्या...

Pankaja Munde News : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत त्यांना विजयासाठी पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
Pankaja Munde News
Pankaja Munde News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आणि भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटनेत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मुंडे या लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाकडे निघाल्या आहेत. मतदारसंघाकडे जाताना लोकसभेचे जे मतदारसंघ येतात तेथील भाजपाच्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत पंकजा मुंडे पुढे जात आहेत. (Latest Marathi News)

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मोहोळ यांचा शुभेच्छा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पक्षाने लोकसभेच्या उमेदवारीची जबाबदारी दिल्यानंतर आता पूर्णपणे आपण लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचा किती फटका तुम्हाला बसेल? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "बीड हा अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे. बीडने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत. अगदी अल्पसंख्यांक समाजाचा खासदार देखील बीडने विजयी केलेला आहे. बीड जिल्हा हा नेहमी विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो. गेली 22 वर्षे मी राजकारणात काम करत आहे."

Pankaja Munde News
Sita Soren Join Bjp: 'एनडीए'ची ताकद वाढणार; झारखंडमध्ये भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न', सोरेन कुटुंबात फूट

बीड जिल्ह्याची पालकमंत्री होते. त्या नात्याने बीड मधील प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्माशी माझा संबंध आलेला आहे. माझ्याविषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटूता नाही. कोणाला कटूता वाटेल असे कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागले नाही. सर्वसमावेशक असे माझे धोरण राहिले आहे. निवडणूक असेल तर मी समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला केवळ उमेदवार म्हणूनच पाहते. त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून पहात नाही. त्यांनीही तसेच माझ्याकडे पहावे अशी अपेक्षा मी ठेवते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde News
BJP News: "शरद पवार आणि राहुल गांधींच्या नादाला लागून..." राऊतांच्या मोदींवरील टीकेला भाजपचं सडेतोड प्रत्युत्तर

"महादेव जानकर हे महाविकास आघाडीकडे जाण्याच्या तयारीत आहे. या प्रश्नावर बोलताना मुंडे म्हणाल्या की, "जानकर महाविकास आघाडीत गेले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसेच निवडणुकीत त्याचा किती फटका बसू शकतो. त्या परिणामांची चर्चा आमच्या पक्षाचे नेते कोअर कमिटीच्या बैठकीत करतील. जानकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पक्षाने दिली तर नक्कीच त्यांच्याशी बोलेल," असेही मुंडे म्हणाल्या.

'लोकसभेची निवडणूक ही माझ्यासाठी नवीन नाही. वयाच्या 17 व्या वर्षापासून मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर निवडणुकीच्या प्रचारात काम केले आहे. मी केलेल्या विकासाचे कामे आणि लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास या जोरावर मला लोकसभेची (Lok Sabha) उमेदवारी मिळालेली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ही निवडणूक लढवली विजय मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे," असेही मुंडे म्हणाल्या.

मी लोकसभेची उमेदवार -

"राज्यातील प्रचाराची जबाबदारी राज्यातील नेत्यांच्या खांद्यावर आहे. ती जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील, असा मला विश्वास आहे. पक्षाने प्रचाराची जबाबदारी दिल्यास नक्कीच यासाठी प्रयत्नशील राहील. मी सध्या लोकसभेची उमेदवार आहे, त्यामुळे मी माझे लक्ष तिथे केंद्रित केले आहे," असेही मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com