anil jagtap, sachin muluk, Kundlik Khande sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : शिवसेनेत गटबाजी, तीन जिल्हाप्रमुखांचे दोन गट; उमेदवारीसाठी थोपटले दंड

Datta Deshmukh

Beed : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने बीड जिल्ह्यात तीन जिल्हा प्रमुख नेमले. ठाकरे गटाप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तीन जिल्हाप्रमुख नेमले. पण, तीन जिल्हाप्रमुख झाले आणि शिंदे गटात गटबाजी सुरू असल्याचे चित्र अधिक गडद झाले. तीन जिल्हा प्रमुखांचे आता दोन गट झाले आहेत. एका गटात जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि जिल्हा प्रमुख सचिन मुळूक एकत्र आहेत. एक गट कुंडलिक खांडे यांचा आहे. (Shivsena News)

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सचिन मुळूक (Sachin muluk) आणि कुंडलिक खांडे यांना बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद देण्यात आले. सचिन मुळूक यांच्याकडे केज, परळी, माजलगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ तर, कुंडलिक खांडे यांच्याकडे बीड, गेवराई व आष्टी हे तीन मतदारसंघ होते. सुरुवातीला मुळूक व खांडे एकदिलाने काम करत होते. नंतर मात्र माशी शिंकली.

बीड विधानसभा लढविण्याची कुंडलिक खांडे यांची मनिषा आहे तर नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून बीडची जागा पदरी पडून नागराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवायची सचिन मुळूक यांची मनिषा यांची आहे. सचिन मुळूक हे बीडचे रहिवाशी आहेत. दरम्यान, मागच्या महिन्यात अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काहीच दिवसांत त्यांच्या गळ्यात देखील जिल्हाप्रमुखपदाची माळ पडली. दोघांत तिसरा झाला आणि प्रत्येकाला दोन विधानसभा मतदारसंघाची जबादारी मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघटनेच्या फेरनिवडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत जिल्हा प्रमुखपदाचे नियुक्तीपत्र घेताना अनिल जगताप आणि सचिन मुळूक एकत्र होते. तर, याच वेळी बीडमध्ये कुंडलिक खांडे यांनी सरपंच-उपसरपंच संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची घोषणा केली. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने अनिल जगताप यांना दिली मात्र आपण बुथनिहाय संघटन बांधल्याने मुख्यमंत्री आपल्यालाच उमेदवारी देतील, असा विश्वास देखील खांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला.

तेव्हापासून जगताप - मुळूक असा एक सुभा आणि खांडे यांनी सवतासुभा मांडल्याचे दिसतो आहे.आता महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटेल का आणि उमेदवारी जगताप आणि खांडे यापैकी कुणाला मिळणार हे प्रश्न आहेत. त्यात, अनेक वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुख राहिल्याने शहरात अनिल जगताप यांचे संघटन असल्याने आपल्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी सोपी जाईल ही सचिन मुळूक यांची अपेक्षा किती खरी ठरते हेही पाहावे लागेल.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT