Eknath Shinde News : वाढदिवसाआधी मुख्यमंत्री शिंदेंचा नवा अवतार; 'हातात धनुष्य, भगवा झेंडा अन् पाठीवर भाता..'

Thane Political News : वैती यांची ठाकरे कुटुंबावरील श्रद्धा कमी झाल्याचे दिसत आहे...
Eknath shinde
Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे शहराचे माजी महापौर अशोक बारकू वैती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. वैती यांनी लावलेला हटके बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. पहिले म्हणजे त्या बॅनर्सवरून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र गायब झाले. तसेच बॅनरवर 'सेना भी तैयार है.. और सेनापती भी..' असा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांच्या एका हाती भगवाध्वज तर दुसऱ्या हाती धनुष्य आणि पाठीवरच्या भात्यात बाण ठेवले आहेत. हा बॅनर्स लावून वैती यांनी एकीकडे शुभेच्छा तर दुसरीकडे उबाठाला डिवचण्याचे काम केले आहे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे तर काम केले तर नाही, ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (Latest Political News)

Eknath shinde
Bjp News : 'मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्रजी जैसा हो'; भाजपच्या सभेत घोषणा, शिंदे गट पेचात

नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा 60 वा वाढदिवस आहे. त्यामुळे शहरात बॅनर्स लावून आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यातच गुरुवारी सकाळी माजी महापालिका अशोक वैती यांनी नामी शक्कल लढवत, महापालिका मुख्यालय समोर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या समोर रस्त्यावर बॅनर्स लावले आहे. त्या बॅनर्सवर मुख्यमंत्री शिंदे यांचा उभा फोटो आहे.

Eknath shinde
Nitin Banugade Patil At Miraj Melava: 'शिवसेना संपणारी नाही तर इतरांना संपविणार' ; बानुगडेंचा शिंदे गटावर प्रहार

तसेच शिंदे यांच्या मस्तकावर दिवंगत आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र गायब आहे. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातूनच बाळासाहेबांचे फोटो गायब आहे. 'तसेच सेना भी तैयार है.. और सेनापती भी असा उल्लेख करुन त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना ठाकरे गटाला डिवचण्याचे काम केले आहे. या बॅनर्समुळे वैती यांची ठाकरे कुटुंबावरील श्रद्धा कमी झाल्याचे दिसत आहे. असे उघड-उघड बोलले जाऊ लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com