Rajesh Kadam Beed Visit: राजेश कदमांनी घेतला बीडचा आढावा; मुळूक यांचे कौतुक करत कार्यकर्त्यांनाही दिला कानमंत्र

Beed Politics : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागावे; राजेश कदम यांचे पदाधिकारी, शिवसैनिकांना आदेश
Rajesh Kadam Beed Visit
Rajesh Kadam Beed VisitSarkarnama
Published on
Updated on

Beed News: "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळात पोहचवून पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांचा नेहमी प्रयत्न असतो, शिवसेनेने याआधी या भागात एकही विधानसभा अथवा कुठल्याही निवडणुका लढवल्या नाही तरी पण तिथे शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. मुळूक यांच्या रूपाने उच्चशिक्षित जिल्हाप्रमुख शिवसेनेला मिळाला आहे", अशा शब्दांत पक्षाचे निरीक्षक राजेश कदम यांनी मुळूक यांचे कौतुक केले. याचवेळी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कानमंत्र देत कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.

"शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे त्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, शिवसैनिकांनी कामाला लागावे", असे आदेशही राजेश कदम यांनी दिले.

Rajesh Kadam Beed Visit
Maharashtra Talathi Exam : तलाठी परीक्षेच्या पहिल्या सत्रात 'सर्व्हर डाऊन'चा गोंधळ; महसूलमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढण्यासाठी कदम यांनी बीड शहरात माजी मंत्री सुरेश नवले, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. तसेच यावेळी आगामी निवडणुका पाहता काही महत्वाचे निर्देश देखील त्यांनी दिले.

यावेळी कदम यांनी सांगितले की, "एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. विकास कामामध्ये महाराष्ट्र अव्वल असून विविध घटकांसाठी अनेक योजनांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अंमलबजावणी करत आहे. या कामांचा उहापोह करुन सामान्यांना शिवसेनेसोबत जोडावे", असे ते म्हणाले.

Rajesh Kadam Beed Visit
BJP MLA Serious Allegation On Khadse : एकनाथ खडसे अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करतात; भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सुधीर काकडे, जयसिंग चुंगडे, उपजिल्हाप्रमुख गणेश नवले, परमेश्वर तळेकर, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती बांगर, उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा आदींची उपस्थिती होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com