Rana Patil, Padmsinh Patil, Omraje Nimabalkar Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : सेनेकडे चार गावे; राणा जगजितसिंह यांना तुळजापूरमध्ये अपयश!

उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण झाली.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण झाली. राज्यात शिवसेनेतील दुफळीमुळे शिवसेनेला फटका बसत असला तरी ग्रामीण भागात मात्र उद्धव ठाकरेंना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायती पैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यात शिवसैनिकांना यश आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक पाच ग्रामपंचायती स्थानिक आघाडीला मिळाल्या आहेत. तर त्या खालोखाल चार ग्रामपंचायती शिवसेनेला मिळाल्या आहेत. शिंदे गटाला केवळ एकच ग्रामपंचायत जिंकता आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र एकही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविता आली नाही.

भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना त्यांच्या तुळजापूर मतदारसंघात एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. मात्र कळंब तालुक्यात भाजपच्या ताब्यात एक ग्रामपंचायत आली आहे.

शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना देखील ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही या तालुक्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपला झेंडा रोवत 4 ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत तर जिल्ह्यात 5 ग्रामपंचायत स्थानिक विकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही ग्रामपंचायत वर विजय मिळवता आला नाही. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतरही शिवसेनेने उस्मानाबादचा गड राखण्यात यश मिळवले आहे त्यामुळे बंडखोरीनंतर ही उस्मानाबाद मध्ये शिवसेना भक्कम उभा असल्याचे दिसते आहे

जिल्हा : उस्मानाबाद

एकूण ग्रामपंचायत 11

शिवसेना :

ठाकरे गट : 04

शिंदे गट : 1

भाजप : 01

काँग्रेस : 00

राष्ट्रवादी : 00

मनसे : 00

इतर : 05( स्थानिक आघाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT