भाजपच्या सुभाष देशमुखांना झटका : ग्रामपंचायतींमधील सत्ता शिवसेना-काँग्रेसने हिसकावली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत सुभाष देशमुख गटाची हार
Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh Hasapure
Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh HasapureSarkarnama

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी या ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना झटका बसला आहे. या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख गटाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. देशमुख गटाला मनगोळीत एक जागा मिळाली आहे. मात्र, चिंचपूरमध्ये तर भोपळाही फोडता आलेला नाही. यातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena), तर मनगोळीत काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे. (Defeat of Subhash Deshmukh group in both gram panchayat elections of South Solapur)

सोलापूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी (ता. ४ ऑगस्ट) मतदान झाले होते. त्याचा निकाल आज (ता. ५ ऑगस्ट) जाहीर झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये राज्यातील सत्ताधारी भाजपचे सुभाष देशमुख गटाला हार पत्कारावी लागली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीवर यापूर्वी भाजपच्या सुभाष देशमुख गटाचेच वर्चस्व होते, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख गटाला हा धक्का आहे.

Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh Hasapure
बार्शीत राजेंद्र राऊतांचीच हवा : दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला विजयाचा झेंडा!

शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाने विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सातपैकी सात सदस्य निवडून आले आहेत.

Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh Hasapure
एकनाथ शिंदे गटाचा पहिला विजय : पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे चिंचपूर गावची सत्ता आली आहे. या ठिकाणी भाजप आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे.

Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh Hasapure
पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला; शहाजीबापूंनी लावली फिल्डिंग!

दरम्यान, तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षांनी मिळून ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनेलच्या सहापैकी पाच उमेदवारांनी बाजी मारली आहे. मागील १५ वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या भाजपच्या सत्तेला खिंडार पाडण्यात हसापुरे यांना यश आले आहे.

Subhash Deshmukh-Sanjay Gaikwad- Suresh Hasapure
काँग्रेसच्या अडचणीत भर; मल्लिकार्जुन खर्गेनांही ईडीने बोलावले

भाजपचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपच्या पर्यायाने सुभाष देशमुख यांच्या हातून निसटल्या आहेत. विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत हलगीच्या तालावर जल्लोष साजरा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com