एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली.. उरलेली संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे...

रेडी redy नावाचं एक पोर्ट Port असून त्यांचे भाच्चे Nefew ते चालवतात, त्यातून एकही रुपया खर्च न करता 300 कोटी रुपयांचा फायदा त्याला झालाय.
Deepak Kesarkar, Vinayak Raut
Deepak Kesarkar, Vinayak Rautsarkarnama
Published on
Updated on

सावंतवाडी : राजकारण हा विनायक राऊतांचा धंदा बनलाय असून त्यांना निष्ठा वगैरे काही नाही. त्यामुळे एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली. उरलेली शिवसेना संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत, असं माझं मत आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, विनायक राऊतांचं नेमकं शिक्षण मला माहिती नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण हे फारसं चांगलं नाही. पण, ते जर असे बोलत असतील तर चुकीच्या माणसाला मी खासदार म्हणून निवडून आणलं असं मी समजेल.

Deepak Kesarkar, Vinayak Raut
पैसे घेतल्याशिवाय विनायक राऊत कुठेही जात नाहीत; बॅग तयारच ठेवावी लागते : क्षीरसागर

कारण, मी जो लढा दिला, त्यामुळेच विनायक राऊत निवडून आले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यांना कोकणात कसं ट्रीट केलं जात हे मला माहिती आहे. राजकारण हाच त्यांचा धंदा आहे. रेडी नावाचं एक पोर्ट असून त्यांचे भाच्चे ते चालवतात, त्यातून एकही रुपया खर्च न करता 300 कोटी रुपयांचा फायदा त्याला झालाय. त्यामुळे राजकारण हा त्यांचा धंदा बनलाय, यांना निष्ठा वगैरे काही नाही. म्हणूनच एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली उरलेली शिवसेना  संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत, असे माझे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com