Yogesh Kadam 1 Sarkarnama
मराठवाडा

Yogesh Kadam visit Beed : फरार कृष्णा आंधळेविषयी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं विधान...

Minister State Yogesh Kadam Sarpanch Santosh Deshmukh Massajog village Beed : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बीडमध्ये मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर फरार कृष्णा आंधळेवर प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Santosh Deshmukh Sarpanch death : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्याच सुनावणीत, घटनेशी वाल्मिक कराड याचा कसा संबंध आहे, फोन काॅलच्या सीडीआरकडे न्यायालयाचे लक्ष वेधत, मोठ्या पुराव्याकडे लक्ष वेधले.

या संवेदनशील घटनेच्या न्यायालयीन लढाईत काय होत, याकडे लक्ष असतानाच, शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या हत्येतील प्रमुख, पण फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी मोठं विधान केले.

वाल्मिक कराड आणि महादेव गीतेचे जेलमध्ये टोळीयुद्ध भडकल्यावरून मंत्री कदम यांनी मुख्य आरोपींना बीड (BEED) जेलमधून स्थलांतरित केले जाईल.जेल प्रशासन vip ट्रीटमेंट देत असतील, तर चौकशी होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे या घटनेतील प्रत्येक गोष्टीवर लक्ष असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.

पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपींना पळून जाण्यास मदत झाली. वाँटेड कृष्णा आंधळेला पकडण्याचे शंभर टक्के प्रयत्न सुरू आहे. त्याला आज ना उद्या पोलिस पकडतील, हा मला विश्वास आहे. आरोपींना मदत होईल, असे कृत्य केलेल्या पोलिस (Police) अधिकाऱ्यांना मदत केली जोईल. कोणालाही सोडणार नाही. काहींना निलंबन केलेले आहे. या कारवाईनंतर देखील पश्चाताप झालेल्या नसलेल्या अधिकाऱ्याना बडतर्फ करणार असल्याचे इशारा मंत्री कदम यांनी दिला.

मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या घराचे बांधकाम केले जात आहे. यासंदर्भात बोलताना मंत्री योगेश कदम यांनी शिंदे साहेबांच्या आदेशाने मी इथं घराची पाहणी करायला आलो होतो. पावसाळ्याच्या अगोदर या घराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. शिंदे साहेब घर पूर्ण झाल्यावर उपस्थित राहणार आहेत, असे सांगिलते.

शिंदे साहेबांना कुटुंबाला घर नसल्याचे समजल्यावर त्यांनी लागलीच घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काम सुरू झाले आहे. घर भरणीसाठी स्वतः शिंदे साहेब उपस्थित राहतील. फक्त घरच नाही, तर वैभवच्या शिक्षणासाठी शिंदे साहेब लक्ष ठेवून आहेत. देशमुख कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचेही मंत्री योगेश कदम यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT