Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar News : ...अन् खोतकरांनी जास्त गॅस सिलिंडरसाठी कशी चालाखी करायची हे भर कार्यक्रमात महिलावर्गाला सांगितलं!

Arjun Khotkar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिला वर्गाने घरच्यांना फाट्यावर मारू नये, असा मिश्किलपणे सल्लाही दिला.

Mayur Ratnaparkhe

Shivsena Jalna MLA Arjun Khotkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी एका कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देताना, उपस्थित महिला वर्गाला शासनाच्या योजनेतून अधिकचे गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी एक चालाखी करण्यास सांगितल्याच समोर आले आहे. शिवाय लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे महिलांनी घरच्यांना फाट्यावर मारू नये, असा सल्लाही दिला.

अर्जुन खोतकर म्हणाले, आपण हे भगिनींना सांगितलं पाहिजे की, एकनाथ शिंदे हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत. आता घरच्यांना फाट्यावर नका मारू. नाहीतर घरी जाऊन नवऱ्याला सांगाल आता मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण(Ladki Bahin Yojana) आहे, आता मी घाबरत नाही. असं काही करू नका.'

याचबरोबर 'मुख्यमंत्र्यांनी आता तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे? तीन गॅस सिलिंडर. आता ही योजना घरातील केवळ दोन जणांना लागू होते. आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो, साहेब अनेक घरांमध्ये तर एक सासू आणि दोन सूना आहेत, मग अशावेळी भांडणं लागतील ना? तुम्ही असं करू नका, जेवढ्या घरात महिला आहेत, तेवढ्यांना देवून टाका. त्यामुळे आता घरात जेवढ्या महिला असतील, म्हणजे जर एक सासू आणि तीन सूना असतील तर त्या चौघींना ही योजना मिळणार आहे.' असं खोतकरांनी(Arjun Khotkar) सांगितलं.

तसेच 'आता एक थोडीशी हुशारी तुम्ही करायची, एका परिवारासाठी तीन गॅस सिलिंडर मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहेत. आता तुम्ही माझं ऐका फक्त थोडी चालाखी करा. आता सासू वेगळी राहते, दोन सूना वेगळ्या राहतात, तुम्ही वेगळं राहू नका फक्त कागदावर वेगळं राहत असल्याचं दाखवा. मग तुम्हाला गॅस सिलिंडर वाढून मिळतील ना. चारजणी असतील तर बारा सिलिंडर मिळतील.' असं खोतकर याप्रसंगी म्हणाले.

याशिवाय, 'बघा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय दिलं. 1500 रुपये गॅस सिलिंडर, लेक लाडकी योजना. तुमच्या घरात मुलगी जन्मली मुलीची खात्यावर नोंद केली की पाच हजार रुपये मिळतात, पंधरा वर्षांची मुलगी झाली की मुलीच्या खात्यावर एक लाख रुपये जमा होतात.' अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT