Raosaheb Danve News : "अर्जुन खोतकर हे सून, तर मी सासू", रावसाहेब दानवेंची जोरदार फटकेबाजी

Raosaheb Danve, Arjun Khotkar News : रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. दोघांनी एकमेकांचं तोडभरून कौतुक केलं. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या विरोधकांना मात्र धक्का बसला.
Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Raoasaheb Danve | Arjun KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Jalna news, 6 May : ऐन लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) शिवसेना ( शिंदे गट ) नेते अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात वैचारिक मतभेद दिसत होते. याची प्रचिती जालनाकरांना वेळेवेळी आली आहे. पण, काही दिवसांपूर्वी दानवे यांनी 'दर्शना' निवासस्थानी जात अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर केली. त्यानंतर खोतकर दानवे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

जालना मतदारसंघातील ( Jalna Lok Sabha Constituency ) गोलापांगरी येथील प्रचार सभेत दानवे-खोतकर एकत्र आले होते. यावेळी अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) यांच्याकडून कौतुक केल्यानंतर रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवे म्हणाले, "राजकारणात चांगले काम केल्यामुळे मी सभापती, आमदार, खासदार, मंत्री झाले. आपण केंद्राकडून मोठ्या प्रमाणात विकासाठी निधी आणला. पण, बांधकाम, सिंचन ही खाती राज्य सरकारकडे असल्यानं मी उद्घाटनाला येत नाही. अर्जुन खोतकर आणि अरविंद चव्हाण या माझ्या सुना आहेत, तर मी त्यांची सासू आहे. त्यामुळे सासूचे काम केवळ निधी आणणं आहे. मी आणलेल्या निधीतून झालेल्या विकासकामांचं उद्घाटन मीच करतो."

"राजकारणात सत्य, चांगुलपणा महत्वाचा"

"नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. तर त्यांच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांना कॅबिनेट मंत्री झालेलं पाहायचं आहे. राजकारणात सत्य, चांगुलपणा महत्वाचा असतो. तो रावसाहेब दानवे आणि माझ्यात आहे. आम्ही तो कायम जपत आलो आहे," असं खोतकर यांनी म्हटलं.

Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Jalna Loksabha Constituency : '...तर जाहीर सभेत उठाबशा मारेन' ; दानवेंचे विरोधकांना चॅलेंज!

"संबंध जपणे आणि सांभाळणे हीच भूमिका"

"आमच्यात मतभेद होतात, काही गोष्टी पटत नाहीत. म्हणजे आम्ही फारकत घेतली, असं होत नाही. कुठे थांबायचं हे आम्हाला कळत. संबंध जपणे आणि सांभाळणे हीच भूमिका आपण घेत आलो आहोत," असं स्पष्टीकरण खोतकर यांनी दिलं आहे.

Raoasaheb Danve | Arjun Khotkar
Raosaheb Danve News : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना; नाराज खोतकर दानवेंच्या प्रचारात सक्रिय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com