Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti Politcs: महायुतीत खळबळ!शिवसेना आमदाराचे भाजपच्या बड्या नेत्यावर सनसनाटी आरोप; म्हणाले,'मंत्र्यांसमोरच बैठकीत...'

Eknath Shinde Shivsena News : काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी मंत्रि‍पदाची इच्छा व्यक्त करत आरोग्य खात्यात काम करायला आवडेल असंही म्हटलं होतं. यानंतर काहीच दिवसांत संतोष बांगर यांचा फोनवरुन आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढत त्याला सज्जड दम भरल्याचं दिसून आलं होतं.

Deepak Kulkarni

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे सातत्यानं आक्रमक भूमिका मांडत असतात. त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे कधी स्वत: तर कधी त्यांनी पक्षालाही अडचणीत आल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. आता संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी महायुतीतील सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या भाजप नेत्यावरच सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरीमध्ये बुधवारी(ता.13) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. याच बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक आरोप करत संतोष बांगर यांनी केल्यामुळे महायुतीतील वादाचा नवा अंक हिंगोलीत सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

संतोष बांगर म्हणाले, कळमनुरी येथे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील आढावा बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाज काढल्याचा आरोप केला आहे. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आपली पोळी भाजून घेत खिशे भरायचा धंदा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला .

याच बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी एसडीएम, तहसीलदार, बीडीओ यांच्यासोबत अत्यंत खालच्या भाषेत बोलणे, तुम्हाला लाज आहे का? अशी भाषा वापरल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यालाच खडेबोल सुनावल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

बांगर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचेसारखे असून त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी केल्याशिवाय ते राहणार नाहीत. मी बैठक घेतलेली नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलावत त्यांना काळजी करु नका असं सांगितल्याचंही बांगर म्हटलं.

भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना माझा मुख्यमंत्री असून मी तुम्हाला सस्पेंड करणार सांगितलं असल्याचंही बांगर म्हणाले.पण कालच्या आढावा बैठकीमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल करण्याचं काम केल्याचा दावाही बांगर म्हणाले. यावेळी मेघना बोर्डीकर यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचंही नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले संतोष बांगर कायमच वादग्रस्त राहिले. अधिकाऱ्यांना धमकावणे, रुग्णालयातील पेशंटचे बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांना फोनवरून दम देणे, हॉस्टेलमध्ये जाऊन प्राचार्यांना कानफटवणे अशा अनेक प्रकरणात आमदार संतोष बांगर गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत.

काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी मंत्रि‍पदाची इच्छा व्यक्त करत आरोग्य खात्यात काम करायला आवडेल असंही म्हटलं होतं. यानंतर काहीच दिवसांत संतोष बांगर यांचा फोनवरुन आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढत त्याला सज्जड दम भरल्याचं दिसून आलं होतं.

शिवसेना आमदार संतोष बांगर एका आरटीओ अधिकाऱ्याला झापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका शाळकरी रिक्षाला दंड आकारल्यामुळे आमदार बांगरांचा पारा चढला असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

आमदार संतोष बांगर यांनी ऑटो रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर आरटीओ अधिकार्‍यालाच फोन लावला. यावेळी त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली. यात त्यांनी संबंधित अधिकार्‍याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिल्यामुळे ते नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT