Pune court issues arrest warrants against BJP and NCP leaders in 2017 bullock cart race ban protest case.
Pune court issues arrest warrants against BJP and NCP leaders in 2017 bullock cart race ban protest case.Sarkaranama

Pune Politics : महेश लांडगे, दिलीप मोहिते, आढळराव पाटलांना अटक करण्याचे आदेश; पुण्यातील 32 जणांविरोधात वॉरंट

Pune Politics : महेश लांडगे, दिलीप मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील, बाळा भेगडे यांच्यासह 32 जणांना अटक करण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.
Published on

Pune News : भाजप आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह तब्बल 32 जणांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने खेड न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे. या सर्व नेत्यांनी या वॉरंटविरोधात उपजिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

2017 मधील बैलगाडा शर्यत बंदीविरोधात चाकणला पुणे-नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालकांनी जवळपास 3 तास वाहतूक रोखून धरली होती. बैलगाडा मालकांनी रस्त्यावरच बैल बांधल्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

त्यावेळी राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्या यासाठी सरकारने अध्यादेश काढला होता. तसेच प्राण्यांना इजा न होता शर्यती घ्याव्या असेही सुचवले होते. मात्र त्याविरोधात पेटा सामाजिक संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा खीळ बसली होती. याविरोधात सर्वपक्षीय नेते आणि बैलगाडा मालकांनी पेटा संस्थेविरोधात घोषणाबाजी देत आंदोलन केले होते.

याबाबत बोलताना माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, शासनाने राजकीय आंदोलनाच्या केसेस मागे घेतल्या आहेत त्यामुळे आम्ही अनुपस्थित राहिलो. केसेस मागे घेण्याची फक्त कायदेशीर प्रक्रिया राहिली आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ही आंदोलने आम्ही समाजासाठी केली होती. त्यात आमचा वैयक्तिक काहीही दोष नाही. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली तर आम्ही जाणूनबुजून काही केलं आहे असा त्याचा अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com