Sanjay Shirsat News : संजय शिरसाट यांची साडेसाती संपेना! दीड हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याची तक्रार थेट सतर्कता आयोगाकडे..

Allegations of tender scam in Social Justice Department under Sanjay Shirsat : आपल्या मागे लागलेली साडेसाती दूर व्हावी म्हणून संजय शिरसाट यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन दर्शनही घेतले. मात्र घोटाळा आणि भ्रष्टाचारांचे आरोप त्यांची पाठ काही सोडत नाहीयेत.
Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपताना दिसत नाहीये. शिरसाट मंत्री असलेल्या सामाजिक न्याय विभागात पंधराशे कोटी रुपयांचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप करत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी थेट केंद्रीय सतर्कता आयोगाकडे तक्रार केली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या टेंडरचे काम जे पावणेचार, चार टक्क्यांनी मिळायला हवे होते ते आता अठरा टक्क्यांनी दिले जात असल्याचा आणि यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार (Tender Scams) केल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणात तीन आयएएस अधिकार्‍यांची आपण मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे. सामाजिक न्याय विभागात अनेक अधिकारी हे ठाण मांडून आहेत. नियमाने ज्यांची बदली व्हायला हवी ते अधिकारीही याच विभागात राहून टेंडर प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत.

आपल्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने न घेतल्यामुळे संबंधित आयएएस अधिकार्‍यांची तक्रार आपण केंद्रीय सतर्कता आयोगाकडे केल्याचे विजय कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Sanjay Shirsat) कुंभार यांनी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त पदभार असलेले बेलदार आणि माजी आयुक्त प्रकाश बकोरिया यांची नावे घेत या तीनही अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat News: संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा शिरसाटांनी घेतला मोठा धसका; म्हणाले,'आता बेडरुमच काय...'

बकोरिया यांच्या निदर्शनास आपण हा सगळा प्रकार आणून दिला होता, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आता आपण थेट केंद्रीय सतर्कता आयोगाकडे धाव घेतली असल्याचे कुंभार म्हणाले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एमआयडीसीचा प्लॉट, बेकायदा जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले.

Sanjay Shirsat News
Shalarth ID Scam : ‘शालार्थ’ घोटाळ्यात 2 अधिकाऱ्यांना अटक होताच मोठा ट्विस्ट; SIT तून पोलिस उपायुक्तांना हटवले

याशिवाय हॉटेल खरेदी प्रकरणात त्यांच्या मुलाने सहभाग घेत राजकीय दबाव आणून कमी किमतीत हॉटेल खरेदीचा प्रयत्न केला होता, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय विभागामध्ये दीड हजार कोटी रुपयांच्या टेंडर घोटाळ्याचा ही आरोप केला होता. तेव्हापासूनच या प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरू होती.

Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांचा पाय आणखी खोलात! सामाजिक न्याय विभागात 1,500 कोटींचा टेंडर घोटाळा

मात्र संजय शिरसाट यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत ते राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा केला होता. दरम्यान संजय शिरसाट यांचा बेडरूम मधील नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शिरसाट पुन्हा चर्चेत आले. आपल्या मागे लागलेली साडेसाती दूर व्हावी म्हणून संजय शिरसाट यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन दर्शनही घेतले. मात्र घोटाळा आणि भ्रष्टाचारांचे आरोप त्यांची पाठ काही सोडत नाहीयेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सामाजिक न्याय विभागातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांची थेट केंद्रीय सतर्कता आयोगाकडे तक्रार केल्याने शिरसाट यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Sanjay Shirsat News
Uddhav Thackeray Shivsena: ठाकरेंच्या शिवसेनेनं झटकली मरगळ..; भ्रष्ट अन् वाचाळ मंत्र्यांविरोधातला सगळा संताप बाहेर काढला

एकीकडे कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन दिवसांपूर्वी राज्यभरात जनअक्रोश आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाची या कलंकित मंत्र्यांमुळे बदनामी होत असल्याचा दावा करत लवकरच शिंदे यांच्या मंत्र्यांवर कारवाई होईल, असा दावा अंबादास दानवे यांनी केला होता. त्यात आता संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागातील दीड हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याने शिरसाट हे पुन्हा विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com