Shiv Sena workers tearing down welcome banners in Dharashiv after key local leaders' photos were excluded, sparking internal party conflict Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले

Dharashiv Shivsena Banner Controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री सध्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या जिल्ह्याचे ते पालकमंत्री असून उमरगा येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी ते येणार आहेत.

Jagdish Patil

Dharashiv News, 20 Jul : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री सध्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या जिल्ह्याचे ते पालकमंत्री असून उमरगा येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी ते येणार आहेत.

प्रताप सरनाईक पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी शहरात जागोजागी बॅनरबाजी केली आहे. मात्र, आता याच बॅनरवरून शिवसैनिकांमध्येच मोठा वाद झाला आहे.

बॅनरवर फोटो न छापल्याने चिडलेल्या शिवसैनिकांनीच पालकमंत्री सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील वाद चव्हाट्याव आल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी उमरगा शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनरवर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले यांचा फोटो नाही.

शिवाय माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांटाही फोटो नसल्यामुळे चौगुले आणि गायकवाड यांच्या समर्थकांनी हे बॅनर फाडल्याचं सांगितलं जात आहे. शहरातील विविध ठिकाणचे जवळपास 8 ते 10 बॅनर फाडले आहेत.

दरम्यान, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच झालेल्या या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असून हा वाद चिघळू नये यासाठी हे बॅनर नेमकं कोणी फाडले याचा शोध उमरगा पोलीस घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT