Kailas Patil, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
मराठवाडा

Thackeray Faction News : 'त्या' अधिकाऱ्यांना निलंबित करा, ठाकरे गटाचे आमदार आक्रमक

Shital Waghmare

Thackeray Faction vs Bjp Politics Dharashiv News :

धाराशिव- तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्ग हा राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आई तुळजाभवानीचे तुळजापूर हे रेल्वे मार्गाला जोडले जाणार आहे, परंतु या रेल्वे मार्गासाठी होणारे भूसंपादन, त्याला दिला जाणारा मोबदला यावरून बराच वाद आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विरोधकांकडून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला जातोय, तर हे आरोप फेटाळत शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे आव्हान ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिले आहे.

आता पुन्हा या विषयावरून जिल्ह्यात राजकारण सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा विषय थेट महसूलमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या दरबारात नेला आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी आणि चुकीच्या पद्धतीने निवाडे केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आमदार कैलास पाटील यांनी चुकीचे निवाडे दुरुस्ती करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राधाकृष्ण विखे पाटलांची नुकतीच भेट घेतली.

महसूलमंत्र्यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी बाधित शेतकऱ्यांच्या (धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील) गावाचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यात गावातील 2018 ते 2021 मधील जमीन खरेदी-विक्री व्यवहार गृहीत धरताना फक्त उच्चतम रकमेचे व्यवहार हे अवाजवी दर व 40 गुंठ्यांपेक्षा कमी या कारणामुळे वगळण्यात आले आहेत.

वगळण्यात आलेले व्यवहार हे भूसंपादन अणि पुनर्वसन कायद्यामधील नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे. जमिनीचे सरासरी मूल्यांकन फारच कमी झाले असून, एकूण द्यायचा मावेजा जमिनीच्या चालू बाजारभावापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. जाहीर केलेले अंतिम निवाडे यांच्यातील मोबदला व प्रारूप निवाडे यामध्ये बरीच मोठी तफावत असून, परिणामी शेतकऱ्यांना मोबदला खूपच कमी मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)रि

या निवाड्यामध्ये बागायत जमिनीस जिरायती जमिनीचे दर दिले आहेत. जमिनीतील पाइपलाइन, विहिर, विंधन विहीर, फळबाग, पत्रा शेड यांचेही मूल्यांकन कमी केलेले आहे. या अन्यायकारक व बेकायदेशीर निवाड्यांची ( Dharashiv Politics Latest News ) चौकशी करावी, केलेल्या गंभीर चुकांची दुरुस्ती करून सुधारित निवाडे करावेत, अशी मागणी कैलास पाटील यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

तसेच असे बेकायदेशीर व चुकीचे निवाडे करणार्‍या अधिकार्‍यांना शासन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यापुढेही जिल्ह्यातून मोठे प्रकल्प तसेच मार्ग जाणार आहेत. त्यांच्यावर आताच कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात या यंत्रणेकडून अशी बेकायदेशीर प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे या अधिकार्‍यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT