Loksabha Elections 2024 : परभणीतील लोकप्रतिनिधींचा निधी खर्च; मात्र, डीपीसीचा ९१ टक्के अडकणार !

Parbhani MLA, MP लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने नियमांचा अडथळा होऊ नये, यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.
Parbhani Collector Office
Parbhani Collector Officesarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने परभणी जिल्ह्यातील पाच आमदार आणि दोन्ही खासदारांनी आपला विकासनिधी शंभर टक्के खर्च केला आहे. मात्र, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत मंजूर निधीपैकी ९१ टक्के निधी अखर्चित आहे.

निवडणूक आचारसंहिता म्हणजे लोकप्रतिनिधीसाठी अतिशय अडचणीचा विषय असते. प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा हिशेब द्यावा लागतो. सत्ताधारी पक्षांना कुठलीही घोषणा करण्यास प्रतिबंध, सभा संमेलन यासाठी परवानगीची अट यांसारख्या नियमांचा समावेश असल्याने नेत्यांना आचारसंहितेची कायम धास्ती असते. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विकास निधी खर्च करण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल असतो.

खासदार आणि आमदारांना मतदारसंघातील विविध कामांसाठी शासन विकास निधी देते. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार लोकोपयोगी कामे मंजूर होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती असल्याने नियमांचा अडथळा होऊ नये, यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.

Parbhani Collector Office
Parbhani Lok Sabha Constituency : खासदार जाधवांना निष्ठा कामाला येणार की विरोधकांचे आरोप अडथळा ठरणार ?

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे डॉ. रत्नाकर गुट्टे, परभणी विधानसभा मतदारसंघाचे डॉ. राहुल पाटील आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या मेघना बोर्डीकर या आमदारांनी व खासदार संजय जाधव आणि राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान (Dr. Fauzia Khan) यांनी आपला पाच कोटी रुपये विकास निधी खर्च केला आहे.

जिल्हा वार्षिक नियोजनातून २०२३-२४ साठी परभणी जिल्ह्याकरिता २९० कोटी खर्च अपेक्षित होता. यामध्ये जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचाही समावेश होता. मात्र, तत्कालीन पालकमंत्री सावंत यांच्या कार्यकाळात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता निधीच्या खर्चास मान्यता दिल्याने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parbhani Collector Office
Suresh Varpudkar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने वरपूडकरांना परभणीत 'फ्री हँड'?

त्यामुळे या प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, पुढील निर्देशानुसार खर्च करण्यास मान्यता मिळाली. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि मार्चअखेरची मुदत यामुळे अतिशय कमी कालावधी असल्याने तब्बल ९१ टक्के निधी अखर्चित राहण्याचीच शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Parbhani Collector Office
Parbhani Loksabh News : लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सुनील तटकरेंचा परभणी दौरा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com