Tanaji Sawant : महाराष्ट्रात महायुती 48 विरुद्ध 0 आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दावा

loksabha Election 2024: यवतमाळ येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ,'आपकी बार, चारसो पार,' तर मी म्हणेन महाराष्ट्रात 'महायुती 48 विरुद्ध शून्य'. हेच महाराष्ट्रातून चित्र देशाला पाहायला मिळेल असा दावा त्यांनी केला.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : निवडणुकीच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये 42, 45, 40 अशा काही लोकसभेच्या जागा महायुतीला मिळणार असल्याचे सांगितले जाते, पण ते काही खरे नाही. यवतमाळ येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,'आपकी बार, चारसो पार,' तर मी म्हणेन महाराष्ट्रात 'महायुती 48 विरुद्ध शून्य'. हेच महाराष्ट्रातून चित्र देशाला पाहायला मिळेल, असा दावा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे गुरुवारी 29 फेब्रुवारीला भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत Dhananjay Sawant, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके Datta Salunke , आरपीआयचे संजय बनसोडे sanjay bansode उपस्थित होते.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत Tanaji Sawant म्हणाले, केंद्र सरकार सोबत विकास कसा असतो हे जनतेने पाहिलं आहे. कारण केंद्राच्या मदतीशिवाय विकास होणे अशक्य आहे. ज्या ठिकाणी हजारो कोटींचा निधी लागेल, त्या ठिकाणी केंद्र सरकार Modi Government अगदी हिमालयाप्रमाणे आपल्या पाठीशी उभं राहतं.

Tanaji Sawant
Akshay Dhoble News : ठाकरे गटाचा युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

विरोधाला विरोध किंवा विकासाला विरोध ही सर्वसामान्य जनता खपवून घेत नाही. मागील 40 ते 50 वर्षांपासून ज्यांनी महाराष्ट्र आणि देश मातीत घालण्याचे ध्येय ठेवलं होतं, त्यांना भारतातील 140 कोटी जनतेने झुगारून टाकलेलं आहे. जनतेने नरेंद्र मोदींना Narendra Modi विकास पुरुष, विश्वनेता बनवलं आहे. हे नेतृत्व भारतातील (BJP) जनता कधीही सोडणार नाही. मागील सात पिढ्याला लागलेलं दारिद्र्य घालवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करायचा आहे, तरच महाराष्ट्र आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याची प्रगती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडल्याने जिल्ह्याचा विकास झाला नाही. सहकारी बँका, सूतगिरणी, पतपेढ्या बंद पाडल्या. सहकार म्हणून बंद पाडायचे आणि कुटुंबात सत्ता राबवायची. सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या मुलांना देशोधडीला लावायचं. आता ही पद्धत सेना-भाजप सरकारने हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. जिल्ह्यात नेतृत्वाचा अभाव होता. देत नाही तर हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही, असे नेतृत्व जिल्ह्याला हवं होतं, पण ते मी सिद्ध करून दाखवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By :Rashmi Mane

R

Tanaji Sawant
Hingoli Lok sabha Election 2024: भाजपच्या आमदाराचा दावा हेमंत पाटलांनी फेटाळला; हिंगोलीची जागा शिवसेनेचीच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com