Mahadev Jankar Sanjay Jadhav
Mahadev Jankar Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha Election 2024 Result : परभणीत जानकरांची शिट्टी पिचली; ठाकरेंचा पठ्ठ्या दिल्लीच्या दिशेनं...

Jagdish Pansare

Parbhani loksabha Election : लोकसभेच्या परभणी मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आघाडी कायम राखत महायुतीच्या महादेव जानकर यांना धक्का दिला आहे. जानकर यांची शिट्टी पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच घुटमळताना दिसत आहे. संजय जाधव परभणी तिसऱ्यांदा बॉस ठरण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.

मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीने परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडून पूर्ण शक्तीपणाला लावली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांच्या निकालावर नजर टाकली तर, इथे शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांची निष्ठा भारी ठरताना दिसत आहे.

दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांना 31 हजार 455 तर, महायुतीचे महादेव जानकर यांना 25 हजार 647 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डक फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत, त्यांना 6 हजार 133 मते मिळाली. बसपाचे आलमगीर खान पाचव्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या फेरीच्या निकालात संजय जाधव हे जानकरांपेक्षा 5 हजार 808 मतांची आघाडी घेऊन दमदार वाटचाल करताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणीच्या निवडणुकीत मराठाविरुद्ध ओबीसी, असा संघर्ष भडकला होता. महादेव जानकर यांनी जातीयवादावर ही निवडणूक नेली, असा आरोप संजय जाधव यांनी केला होता. जाणकारांकडून झालेल्या जातीयवादामुळेच मराठा समाजात एकजूट झाली आणि मला त्याचा फायदा झाला, अशी जाहीर कबुली संजय जाधव यांनी दिली होती. आता मतमोजणीनंतर संजय जाधव यांना प्रत्यक्षात मराठा समाजाच्या एक गठ्ठा मतांचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात संजय जाधव यांची ही आघाडी पहिल्या दोन फेरीतली आहे, ती पुढे शेवटपर्यंत कायम राहते का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT