Aurangabad Lok Sabha Constituency : चंद्रकांत खैरेंना लोकसभेत जाण्याची शेवटची संधी मतदार देणार का ?

Lok Sabha Election Maharashtra 2024 : दांडगा जनसंपर्क ही खैरेंची खरी ताकद राहिली आहे. या बळावर त्यांनी दोन वेळा विधानसभेला आणि चार वेळा लोकसभेत विजयाचा झेंडा फडकवला होता. 2019 च्या लोकसभेत झालेल्या पराभवाच्या जखमा शिवसेना, खैरे विसरलेले नाहीत.
Chandrakant Khaire
Chhandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक प्रचारात आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खैरे यांनी याचा अनेकदा उल्लेख केला. त्यामुळे शेवटची निवडणूक म्हणून या निवडणुकीच खैरे यांना मतदारांची सहानुभूती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मतदानानंतर 1 जूनला जाहीर झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून संभाजीनगरची जागा ठाकरे गट म्हणजेच चंद्रकांत खैरे जिंकणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खैरेंसाठी हा दिलासा असला तरी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर तो मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेतील राजकीय पक्षातील प्रवास हा प्रदीर्घ काळ राहिलेला आहे.

मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखा स्थापनेपासून मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे असे सांगणारे चंद्रकांत खैरे नगरसेवक, विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सलग चार वेळा संभाजीनगरचे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते.

राज्यात शिवसेनेत मोठे बंड झाले, निम्मा पक्ष रिकामा झाला, पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह गेले, पण खैरे यांची निष्ठा ढळली नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला. या निष्ठेचे फळ त्यांना संभाजीनगरमधून सहाव्यांदा उमेदवारी देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. उमेदवारीसाठी पक्षात अंबादास दानवे आणि खैरे यांच्यामध्ये स्पर्धा होती. पण ठाकरेंनी खैरेंच्या ज्येष्ठत्वाचा आणि ही त्यांची शेवटची निवडणूक असेल हे लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली.

Chandrakant Khaire
Dr.Bhagwat Karad On Exit Poll : डॉ. भागवत कराडांनी एका झटक्यात एक्झिट पोलची 'सर्जरी' करुन टाकली !

खैरे यांनी वीस वर्षात संभाजीनगरसाठी काय केले? असा प्रश्न आणि निवडणुकीचा मुद्दा विरोधकांकडून केला गेला. यावर खैरे आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून जशासतसे उत्तरही दिले गेले. दांडगा जनसंपर्क ही खैरेंची खरी ताकद राहिली आहे. या बळावर त्यांनी दोन वेळा विधानसभेला आणि चार वेळा लोकसभेत विजयाचा झेंडा फडकवला होता. 2019 च्या लोकसभेत झालेल्या पराभवाच्या जखमा शिवसेना, खैरे विसरलेले नाहीत.

Chandrakant Khaire
Aurangabad Lok Sabha Constituency : भुमरेंना एकनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळणार का ?

यापूर्वी झालेल्या पराभवाचे उट्टे काढून चंद्रकांत खैरे आपल्या 2024 च्या शेवटच्या निवडणुकीत संभाजीनगरात पुन्हा विजयाची मशाल पेटवून ठाकरेंचा बालेकिल्ला त्यांना मिळवून देतात का? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे. खैरे यांचे पुत्र ऋषीकेश, पुतण्या सचिन हे दोघे शहराच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा राजकीय प्रवास पुढे कसा सुरु राहतो? हे पुढील काळात दिसेल. पण आपल्या राजकीय जीवनातील शेवटची लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या खैरेंच्या या प्रवासाचा शेवट गोड होतो का? याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Chandrakant Khaire
Pankaja Munde : 'माझा पराभव झाला मी स्वीकारला...', पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com